एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि स्टिव्ह स्मिथ कर्णधार असलेला राजस्थान रॉयल्स संघ रविवारी (१९ ऑक्टोबर) अबु धाबीच्या मैदानावर आमने सामने आले होते. या सामन्यादरम्यान परिस्थितीनुसार अचूक निर्णय घेण्यासाठी ओळखला जाणाऱ्या धोनीने त्याच्या निर्णयाने अंबाती रायडूची विकेट वाचवली.
झाले असे की, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना लवकरच फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन आणि सॅम करनची महत्त्वपूर्ण विकेट गमावली. त्यामुळे रायडू आणि धोनी मिळून एका बाजूने चेन्नईचा डाव पुढे नेत होते. परिस्थितीचे गांभार्य लक्षात घेऊन हे दोन्ही फलंदाज विकेट वाचवून संघासाठी अधिकाधिक धावा करण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, डावातील ९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर श्रेयस गोपालने रायडूला पायचीत केले.
So Ambati Rayudu literally Walked up to Dhoni Review System asking if he should take the Decision Review System.
The moment Dhoni asked him to take the decision we all knew the decision is going to be reversed. #CSK #RR #CSKvRR #IPL2020
— Amey Pethkar (@ameypethkar9) October 19, 2020
मात्र पंचांनी तातडीने दिलेला निर्णय धोनीला खटकला. त्यामुळे धोनीने रायडूला रिव्ह्यू घेण्यास सांगितला आणि त्याचा हा निर्णय योग्यही ठरला. गोपालने टाकलेला चेंडू फटकावण्यासाठी रायडू पुढे सरकला होता. परंतु त्याने मारलेला चेंडू लेग स्टंपला लागला नसल्यामुळे रायडू नाबाद राहिला.
असे असले तरी, पुढे ९.६ षटकात राहुल तेवतिया आणि संजू सॅमसनने मिळून रायुडूला झेलबाद केले. त्यामुळे तो १९ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १३ धावा करत पव्हेलियनला परतला.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थानविरुद्धचा अटीतटीचा सामना धोनीसाठी ठरला खूपच खास, पाहा का ते
‘२० सिट- अप्स करत असशील तर ३० कर’, माजी पाकिस्तानी दिग्गजाचा धोनीला मौल्यवान सल्ला
आज ना छोडेंगे भैया! बटलरच्या दिमाखदार डाइव्हने केले सीएसकेच्या डू प्सेसिसला चालते
ट्रेंडिंग लेख-
विशेष लेख: सेनापती जिंकतोय पण सैन्य हरतंय
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली