भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तेव्हापासून तो केवळ आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येत असतो. सोशल मीडियावर खूप कमी वेळ सक्रिय असलेला एमएस धोनी बऱ्याच जाहिरातीत झळकत असतो. त्याने अनेक जाहिरातीत काम केले आहे. परंतु ,आता त्याने एक प्रसिद्ध कंपनी सोबत जाहिरात केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे
एमएस धोनीने शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असलेल्या ‘अनॲकेडमी’ (Unacedemy advertisement video) या प्रसिद्ध कंपनीसाठी जाहिरात केली आहे. एमएस धोनीने अनेक जाहिरातीत काम केले आहे. परंतु, अशी जाहिरात तुम्ही आतापर्यंत कधीच पहिली नसेल. या व्हिडिओवर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.
कंपनीने ही जाहिरात लेसन नंबर -७ म्हणून सादर केली आहे. एमएस धोनीच्या आयुष्यात ७ क्रमांकाचे किती महत्व आहे, हे आपल्यापासून काही लपून नाहीये. त्याच्या जर्सी नंबर पासून, गाडीच्या नंबर पर्यंत सर्वच काही ७ आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एमएस धोनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी ट्रेनसमोर ट्रॅकवर धावताना दिसून येत आहे. या व्हिडिओ द्वारे कंपनीने असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, यश मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.
Our most ambitious and Iconic Film till date. Took almost 1 year to make.
Lesson No. 7 https://t.co/b2TNY46UGD
— Gaurav Munjal (@gauravmunjal) January 24, 2022
जाहिरात बनवण्यासाठी लागला एक वर्षाचा कालावधी
अनॲकेडमीचे संस्थापक गौरव मुंजाल यांच्या म्हणण्यानुसार, ही जाहिरात पूर्ण करण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लगला. अर्थात, जाहिरात पाहता पाहता शूटिंग किती अवघड झाले असेल, हे समजून येते. ही जाहिरात कमी आणि एखाद्या चित्रपटाचा काही सेकंदांचा सीन जास्त वाटतो.
Wow ! This is as good as the helicopter shot @msdhoni . This is your story and the story of every cricketer ever! Reminded me of the numerous lows that I went through to achieve the highs in my career! Brilliant life lesson @unacademy. #DhoniUnacademyFilm #LessonNo7 pic.twitter.com/esAVaejIEo
— Virender Sehwag (@virendersehwag) January 24, 2022
या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) ही जाहिरात हेलिकॉप्टर शॉट सारखी असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
Video: ऑस्ट्रेलियातील फलंदाजाची कहर बॅटिंग! ४४ चेंडू सीमापार करत ७२ चेंडूत ठोकल्या २३७ धावा
हे नक्की पाहा: