भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथ (एस बद्रीनाथ) याने एक खुलासा केला आहे. एमएस धोनी कर्णधार म्हणून चेन्नई सुपर किंग्जची (सीएसके) पहिली पसंती नव्हती हे त्याने उघड केले आहे.
संघ व्यवस्थापनाला वीरेंद्र सेहवाग कर्णधारपदी हवा होता, असा त्याने दावा केला आहे. सेहवागला त्याच्या राज्याच्या (दिल्ली) संघाबरोबर खेळायचे होते.
जर बद्रीनाथवर विश्वास ठेवला असता, तर आयपीएलचे चित्र वेगळे असू शकले असते. तो म्हणाला, “आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती आणि जर तुम्ही पाहिले तर चेन्नई सुपर किंग्जची पहिली पसंती वीरेंद्र सेहवाग होती.”
संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला की सेहवाग संघात रुजू व्हावा आणि कर्णधार व्हावे. पण स्वतः सेहवाग म्हणाला की तो दिल्लीत मोठा झाला आहे आणि अशा परिस्थितीत त्याचे दिल्लीशी चांगले संबंध प्रस्थापित होईल.
सेहवाग तयार नव्हता. बद्रीनाथने असेही सांगितले की 2007 मध्ये जेव्हा भारताने टी20 विश्वचषक जिंकला तेव्हा श्रीनिवासन यांनी फक्त एका गोष्टीवर आपले मन बनवले.
तो म्हणाला, “संघ व्यवस्थापन सेहवागच्या दिल्लीत खेळण्याच्या निर्णयाशी सहमत झाले. हे अधिक चांगले होईल असे त्यांना वाटले. त्यानंतर लिलाव प्रक्रिया झाली आणि कोणता खेळाडू चांगला राहील हे त्यांनी पाहिले आणि त्याआधी भारताने 2007 टी20 विश्वचषक जिंकला होता. तर संघ व्यवस्थापनाने धोनीला संघात घेतले.”
पहिल्या लिलावात धोनीला 15 लक्ष अमेरिकन डॉलर्स (तेव्हाचे सहा कोटी) मध्ये संघात सामील करण्यात आले. त्यावर्षीच्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू होता.
पुढे बोलताना तो म्हणाला, “एमएस धोनी 2008 मध्ये सर्वात महागडा खेळाडू होता. संघाने त्याला सहा कोटींमध्ये विकत घेतले. अनेकांना ही गोष्ट माहित नसेल परंतु सेहवागच्या जागी धोनीला निवडले गेले.”
धोनीबद्दल बोलताना तो म्हणाला, “चेन्नईत धोनीच्या आगमनाने संघ व्यवस्थापनाला तीन फायदे दिले. प्रथम, तो जगातील सर्वोत्तम कर्णधार आहे. अशी कोणतीही ट्रॉफी नाही जी त्याने जिंकली नाही. दुसरे म्हणजे तो सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे. जगातील सर्वोत्तम टी20 संघांमध्ये फिनिशर्सची भूमिका खूप महत्वाची आहे.”
उदाहरणं देताना तो म्हणाला, “आजही तुम्ही पाहता मुंबईकडे कायरन पोलार्ड, केकेआरकडे आंद्रे रसेल आणि चेन्नईत धोनी आहे. आणि तिसरे, तो एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. धोनी मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षकांपैकी एक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-आधीच संकटात असलेली चेन्नई स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड तर मारुन घेत नाही ना???
-दुबईतील आयपीएल भारतापेक्षा होणार भारी, पहा कोण म्हणतंय हे…
-कसोटी मालिका तर होणार आहेच, परंतू भारतासाठी अशी करतेय ऑस्ट्रेलिया तयारी
ट्रेंडिंग लेख-
-‘कल्याण एक्सप्रेस’ युएईत धावणार सुसाट
-ऑस्ट्रेलियाला ‘न लाभलेला’ सर्वोत्तम कर्णधार
-दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता