आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं. आता तो आयपीएलचा पुढील हंगाम खेळणार की चालू हंगाम संपल्यानंतर निवृत्ती घेणार?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये माजी क्रिकेटपटू आरपी सिंह आणि सुरेश रैना यांना, धोनी पुढील वर्षी आयपीएल खेळणार की नाही? असं विचारण्यात आलं होतं. आरपी सिंहनं या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलं, मात्र चिन्नाथालानं धोनी ‘खेळणार’ असं म्हणत चेन्नईच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Will MS Dhoni play in IPL 2025?
The answer from Suresh Raina is great news for CSK fans….!!!! pic.twitter.com/wxUdNeAeiT
— Johns. (@CricCrazyJohns) April 17, 2024
सुरेश रैना महेंद्रसिंह धोनीचा चांगला मित्र आहे. त्यामुळे जर त्यानं धोनी पुढच्या हंगामात खेळणार असल्याचा दावा केला असेल, तर कदाचित ‘थाला’ नक्कीच आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसेल. सुरेश रैनाचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे, जेव्हा एमएस धोनी गुडघ्याच्या समस्येनं त्रस्त आहे.
गेल्या सोमवारी, सीएसकेचे गोलंदाजी सल्लागार एरिक सिमन्स यांनी कबूल केलं होतं की, धोनीला गुडघ्याच्या दुखापतीनं ग्रासलं असून त्याला किती वेदना होत असतील याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर धोनी हॉटेलमध्ये लंगडताना दिसला होता. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात लंगडताना दिसला होता.
एमएस धोनीच्या समलाकीन जवळपास सर्वच खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, धोनी मात्र अजूनही आयपीएलमध्ये खेळतो आहे. त्यानं 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धोनी चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2024 मध्ये धोनीनं आतापर्यंत केवळ 25 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्यानं 236 च्या स्ट्राइक रेटनं 59 धावा केल्या आहेत. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, या 59 पैकी 52 धावा धोनीनं केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीनं ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर भडकला इरफान पठाण; म्हणाला, “सर्वात महाग खेळाडू…”
आधी राजस्थानविरुद्ध पराभव अन् आता लाखोंचा दंड, श्रेयस अय्यरला बसला दुहेरी झटका!
दुखापतीमुळे संपली होती आंतरराष्ट्रीय कारकीर्द, आता या बॅडमिंटनपटू केली UPSC क्रॅक!