भारतात सध्या कोरोना विषाणूचे थैमान सुरू असून अनेक लोकांना या विषाणूचा विळखा पडला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार एमएस धोनीच्या आई वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली होती. २१ एप्रिल रोजी हे वृत्त समोर आले होते. त्यानंतर त्यांना रांचीतील एका हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र आता एक आनंदाची बातमी समोर येते आहे. धोनीचे आई वडील हे दोघेही कोरोनातून बरे झाले असून त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देखील मिळाला आहे. या दोघांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता या दोघांचीही तब्येत उत्तम असल्याचे कळते आहे.
मागील आठवड्यात आली होती संक्रमणाची बातमी
मागील आठवड्यात २१ एप्रिल रोजी धोनीचे वडील पान सिंग धोनी आणि आई देवकी देवी यांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची बातमी आली आहे. त्यानंतर त्यांना रांचीमधील बरियातू रोड स्थित पल्स हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. धोनीच्या आई-वडिलांच्या तब्येतीविषयी त्यांनतर हॉस्पिटलने देखील अपडेट दिले होते. हे वृत्त समजताच भारतातून धोनीच्या चाहत्यांकडून त्याचे आई-वडील लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छा देखील आल्या होत्या.
धोनी खेळतोय आयपीएल
एमएस धोनी हा मागील महिन्यापासून इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स संघासोबत आहे. तसेच सध्या चेन्नई सुपर किंग्सचे सामने मुंबईत सुरु असल्याने तोही मुंबईत आहे. तसेच तो जरी मुंबईत असला तरी साक्षी आणि त्याची मुलगी झिवा त्याच्यासह मुंबईत आहेत की त्यांच्या घरी रांचीमध्ये आहेत, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती.
महत्वाच्या बातम्या:
एकाच कसोटी सामन्यात कुटल्या गेल्या तब्बल १३०० धावा, आयसीसीने खेळपट्टीला दिले हे रेटिंग
माझ्या या चुकीमुळे आम्ही सामना गमावला, वॉर्नरने पराभवानंतर दिली कबुली
आयपीएलवर कोरोनाची सावली गडद! खेळाडूंपाठोपाठ दोन अंपायर्सनी देखील घेतली माघार






