भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी क्रिकेटपासून जवळपास ८ महिने दूर होता. त्यानंतर तो आयपीएलमधून भारतीय संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता होती. परंतु जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे त्याच्या या प्रयत्नाला कुठेतरी मोठा धक्का बसला आहे.
आयपीएल २०२०चा (IPL२०२०) १३ वा हंगाम १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
धोनीबद्दल (MS Dhoni) भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आपले मत मांडले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सेहवाग म्हणाला की, भारतीय संघात धोनीचे पुनरागमन होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण निवडकर्त्यांनी यापूर्वीच धोनीच्या जागी खेळण्यासाठी बदली खेळाडू शोधले आहेत.
धोनी आता कसा फीट होईल? हा प्रश्न मांडत ४१ वर्षीय सेहवाग म्हणाला की, “रिषभ पंत आणि केएल राहुल आता फॉर्ममध्ये आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राहुलने चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे राहुल आणि पंतला संघात स्थान न देण्यासाठी असे कोणतेही कारण नाही.”
भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यावरील खराब कामगिरीबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला की, “वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड नेहमी चांगले होते हे आपण समजून घेतले पाहिजे. टी२०मध्ये न्यूझीलंडने विजयाच्या जवळ असताना सामने गमावले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे नेहमी कठीण असते.”
सेहवाग यावेळी म्हणाला की, “हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) पुनरागमनामुळे भारतीय संघात मोठा फरक पडेल. संपूर्ण संयोजन पंड्याच्या अष्टपैलू सामर्थ्याने बदलेल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-जेव्हा टीम इंडिया होती पराभवाच्या छायेत, तेव्हा प्रेक्षकांनी लावली स्टेडियमला आग
-आयपीएल २०२० आता होणार या महिन्यात?
-बरोबर ८ वर्षापुर्वी याच दिवशी सचिनने घेतला होता मोठा निर्णय






