भारताचा माजी कर्णधार धोनी जरी कर्णधार पदावरून पायउतार झाला असला तरी त्याने आजही ट्विटरवर इमोजीमध्ये कोहली आणि स्मिथला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. आयपीएलचे दहावे पर्व हे असे पहिलेच पर्व आहे ज्यात ट्विटरने खेळाडूंसाठी खास ईमोजी बनवल्या होत्या.
आजपर्यंत आयपीएल १०च्या संदर्भात तब्बल १३५ मिलियन ट्विट्स झाले आहेत. परंतु सर्वात विशेष आणि लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे एमएस धोनी हा गेली चार आठवडे ट्विटरवर एक नंबरला आहे. #MSDhoni हा हॅशटॅग वापरून सर्वात जास्त ट्विट आयपीएलच्या ह्या हंगामात झाले आहे.
#GlvMI हा हॅशटॅग मुंबई विरुद्ध गुजरात सामन्याचा होता. जो सामना आयपीएलच्या सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. आयपीएलच्या हंगामात सामन्यासाठीचा सर्वात जास्त ट्विट झालेला हा हॅशटॅग आहे.
सलग चौथ्या आठवड्यात मुंबई इंडियन्स हा ट्विटरवर सर्वात जास्त चर्चा झालेला आयपीएल संघ ठरला आहे.
सर्वात जास्त चर्चा झालेले सामने (अधिकृत हॅशटॅग )
1. #GLvMI (Super-over match)
2. #MIvRPS
3. #RPSvKKR
4. #SRHvKKR
5. #RPSvRCB
सर्वाधिक चर्चा झालेला संघ (अधिकृत अकाउंट)
1. Mumbai Indians (@mipaltan)
2. Kolkata Knight Riders (@KKRiders)
3. Royal Challengers Bangalore (@RCBTweets)
थोडसं आयपीएल ईमोजीबद्दल:
आयपीएल ईमोजी अर्थात एक विशिष्ट हॅशटॅग वापरून केलेला ट्विट. मुख्यत्वे हे ईमोजी आयपीएलमध्ये खेळत असलेल्या मोठ्या खेळाडूंचेच आहेत.
उदा. विराट कोहलीचा ईमोजी टॅग करताना #ViratKohli असे ट्विटमध्ये लिहिले कि आपोआप तो शब्द ईमोजी रूपात दिसतो.