शुक्रवारी (७ मे) बीसीसीआयने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ घोषित करण्यात आला. या संघात मागील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. यात आणखी काही युवा खेळाडूंना देखील स्टँडबायमध्ये ठेवण्यात आले आहे. यानंतर आता माजी संघ निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी एक युवा फलंदाज हा भारतीय संघाचे भविष्य असल्याचे म्हटले आहे.
बीसीसीआयने स्टँडबाय खेळाडू म्हणून अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्झन नागवासवाला यांना स्थान दिले आहे. तसेच देवदत्त पडीक्कलला देखील संघात स्थान देण्याबाबत विचार केला गेला होता. परंतु त्याला स्थान मिळाले नाही. माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद यांना वाटते की, देवदत्त पडीक्कल येणाऱ्या काळात भारतीय संघाचे भविष्य ठरू शकतो.
एमएसके प्रसाद यांनी स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत देवदत्त पडीक्कलबद्दल बोलताना म्हटले की, “भारतीय कसोटी संघात स्थान मिळवायला त्याला थोडा वेळ लागेल. तो नक्कीच असा फलंदाज आहे, जो येणाऱ्या काळात भारतीय संघाचे भविष्य ठरू शकतो. याबाबत कुठलीही शंका नाहीये. परंतु कसोटी संघात पदार्पण करण्यापूर्वी कमीत कमी एक वर्ष त्याला देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्या खेळात सुधारणा करावी लागेल. यानंतर नक्कीच तो कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असेल.”
देवदत्त पडीक्कलची कामगिरी
देवदत्त पडीक्कलला आयपीएल २०२० स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. त्याने या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी सर्वाधिक ४७३ धावा केल्या होत्या. तसेच पदार्पणाच्या हंगामात ४०० पेक्षा अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. यासोबतच आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्याने ६ सामने खेळत १९५ धावा केल्या होत्या. यासोबतच त्याने १ शतक देखील झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मालदीवच्या बारमध्ये डेविड वॉर्नर आणि समालोचकामध्ये झाली हाणामारी! जाणून घ्या पूर्ण प्रकरण
आयपीएल स्थगित झाल्यानंतर सीएसके शिलेदाराच्या पत्नीला केली जातेय शिवीगाळ, कारण धक्कादायक
‘विरुष्का’च्या हाकेला युझवेंद्र चहलचा प्रतिसाद, कोरोना विरोधी मोहिमेत दिली ‘इतक्या’ रुपयांची देणगी





