पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत पुरुष गटात ईशाक इकबाल, अनुराग नेनवानी, अरमान भाटिया, यांनी तर, महिला गटात नेहा घारे, साई संहिता चमर्थी, प्रतिभा नारायण या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत महिला गटात आठव्या मानांकित नेहा घारेने चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या दक्षता पटेलचा 7-5, 6-4असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. कर्नाटकच्या दुसऱ्या मानांकित प्रतिभा नारायण हिने छावणा मल्लेला सरीनचा 6-4, 6-2असा पराभव केला. अव्वल मानांकित साई संहिता चमर्थी हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित सृष्टी दासचा 6-2, 6-3असा पराभव करून आगेकूच केली.
पुरुष गटात अव्वल मानांकित पश्चिम बंगालच्या ईशाक इकबाल याने क्वालिफायर तीर्थ माचीला 6-3, 6-3 असा तर, महाराष्ट्राच्या आठव्या मानांकित अरमान भाटिया याने साहिल गवारेचा 6-3, 7-5असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. कर्नाटकाच्या निक्षेप रवीकुमार याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या मेघभार्गव पटेलचा 6-2, 6-4असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
दुहेरीत पुरुष गटात पहिल्या फेरीत ऍलेक्स सोलंकीने निक्षेप रवीकुमारच्या साथीत जयेश पुंगलिया व साहिल गवारे या जोडीचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(4)असा पराभव केला. सिवादीप कोसाराजू व राजन गुहन यांनी अथर्व शर्मा व आकाश मंडल यांचा 6-4, 6-3असा संघर्षपूर्ण पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: पुरुष गट:
ईशाक इकबाल(पश्चिम बंगाल)(1)वि.वि.तीर्थ माचीला 6-3, 6-3;
अनुराग नेनवानी(दिल्ली)(4)वि.वि.मोहम्मद फहाद(तामिळनाडू)(5)6-4, 7-5;
अरमान भाटिया(महा)(8)वि.वि.साहिल गवारे(महा) 6-3, 7-5;निक्षेप रवीकुमार(कर्नाटक)वि.वि.मेघभार्गव पटेल(महा) 6-2, 6-4;
महिला गट:
साई संहिता चमर्थी(1)वि.वि.सृष्टी दास(महा)(6)6-2, 6-3;
श्राव्या चिलकलापुड्डी(तेलंगणा)(3)वि.वि.सोनशी भटनागर(कर्नाटक)(7) 6-2, 6-4;
नेहा घारे(महा)(8)वि.वि.दक्षता पटेल(महा)(4) 7-5, 6-4;
प्रतिभा नारायण(कर्नाटक)(2)वि.वि.छावणा मल्लेला सरीन 6-4, 6-2;
दुहेरी गट: पुरुष: पहिली फेरी:
ऍलेक्स सोलंकी/निक्षेप रवीकुमार वि.वि.जयेश पुंगलिया/साहिल गवारे (1) 6-4, 7-6(4);
सिवादीप कोसाराजू/राजन गुहन वि.वि.अथर्व शर्मा/आकाश मंडल 6-4, 6-3;
अनुराग नेनवानी/यश यादव(3) वि.वि.प्रणित कुदळे/गोविंद मोहन6-3, 6-1;
कुणाल वझिरानी/हरदिप सिंग संधू वि.वि.कैवल्य कलामसे/अभिषेक शुक्ला 6-4, 6-3;
मोहम्मद फहाद/पृथ्वी सेखर(4) वि.वि.मोहित मयूर/उमेर शेख7-5, 6-2;
महिला गट:
आशी कपूर/अमिषा पटेल वि.वि.एकता इंगळे/साक्षी चुग 6-1, 6-4;
नरीम रेड्डी/सरावानी सीएनएल वि.वि.अनिशा रेड्डी/पी विदिशा रेड्डी 6-1, 6-1.