पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या मेघभार्गव पटेल, कर्नाटकाच्या निक्षेप रवीकुमार, तीर्थ माचीला,यांनी तर, महिला गटात छावणा मल्लेला सरीन या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत पुरुष गटात बिगरमानांकीत महाराष्ट्राच्या मेघभार्गव पटेल याने तामिळनाडूच्या दुसऱ्या मानांकित पृथ्वी सेखरचे आव्हान 6-1, 6-4असे मोडीत काढले. कर्नाटकाच्या निक्षेप रवीकुमार याने महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित अथर्व शर्माचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. क्वालिफायर तीर्थ माचीला याने मध्यप्रदेशच्या सातव्या मानांकित यश यादवचा 7-5, 6-3असा पराभव करून आगेकूच केली.
महिला गटात छावणा मल्लेला सरीन हिने पाचव्या मानांकित ओरिसाच्या अनम अल्मासला 6-2, 6-0असे पराभूत केले. आठव्या मानांकित नेहा घारेने आपलीच राज्य सहकारी ईश्वरी माथेरेचा 6-0, 6-4असा तर, चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या दक्षता पटेलने हरियाणाच्या अँजेला रमणचा 4-6, 6-4, 6-2असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी: पुरुष गट:
ईशाक इकबाल(पश्चिम बंगाल)(1)वि.वि.कोसाराजू सिवादीप(आंध्रप्रदेश) 6-2, 6-3;
तीर्थ माचीला वि.वि.यश यादव(मध्यप्रदेश)(7)7-5, 6-3;
अनुराग नेनवानी(दिल्ली)(4)वि.वि.गॅरी टोकस(दिल्ली)6-3, 7-6(4);
मोहम्मद फहाद(तामिळनाडू)(5)वि.वि.मौलीन आघरा 6-2, 6-1;
अरमान भाटिया(महा)(8)वि.वि.मनवीर रंधावा(महा)3-6, 6-1, 6-2;
साहिल गवारे(महा)वि.वि.रोहीन गजरी(हरियाणा)6-2, 6-3;
मेघभार्गव पटेल(महा)वि.वि.पृथ्वी सेखर(तामिळनाडू)(2)6-1, 6-4;
निक्षेप रवीकुमार(कर्नाटक)वि.वि.अथर्व शर्मा(महा)(6)6-3, 6-2;
महिला गट:
साई संहिता चमर्थी(1) वि.वि.नरीम रेड्डी6-1, 6-0;
सृष्टी दास(महा)(6)वि.वि.पी विदिशा रेड्डी(तेलंगणा)6-1, 6-4;
श्राव्या चिलकलापुड्डी(तेलंगणा)(3)वि.वि.अनिशा थडा रेड्डी 6-3, 6-0;
सोनशी भटनागर(कर्नाटक)(7)वि.वि.माहरुख कोकणी(महा)6-1, 6-2;
नेहा घारे(महा)(8)वि.वि.ईश्वरी माथेरे(महा)6-0, 6-4;
दक्षता पटेल(महा)(4)वि.वि.अँजेला रमण(हरियाणा)4-6, 6-4, 6-2;
छावणा मल्लेला सरीन वि.वि.अनम अल्मास(ओरिसा)(5)6-2, 6-0;
प्रतिभा नारायण(कर्नाटक)(2)वि.वि.बेला ताम्हणकर(महा)6-3, 6-1;