इंडियन प्रीमियर लीगचा १५ हंगाम यशस्वीरीत्या पार पडला. पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने पराभूत केले आणि त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी नावावर केली. यावर्षी अनेक वरिष्ठ खेळाडूंना चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केले नाही. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, पण काही युवा खेळाडू होते, ज्यांना फ्रँचायझीने २० लाखाच्या बेस प्राईसवर खरेदी केले होते. परंतु त्यांनी कोट्यावधी रुपयांचे प्रदर्शन करून दाखवले आहे.
फक्त २० लाख किंमतीचे खेळाडू, ज्यांनी आयपीएल २०२२ मध्ये केले कोटींचे प्रदर्शन
मुकेश चौधरी (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नई सुपर किंग्जमध्ये नेट गोलंदाजाच्या रूपात सहभागी झालेल्या मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) याला फ्रँचायझीने या हंगामात २० लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले. हंगामातील साखळी फेरीच्या १४ पैकी फक्त ४ सामन्यांमध्ये सीएसकेला विजय मिळाला होता, पण मुकेश चौधरी स्वतःची छाप सोडण्यात यशस्वी झाला. त्याने हंगामातील १३ सामने खेळले आणि यामध्ये १६ विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनासाठी जाणकारांनी त्याचे कौतुक केले.
मोहसिन खान (लखनऊ सुपर जायंट्स)
लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा त्यांचा पहिला आयपीएल हंगाम होता आणि यासाठी त्यांना एक भक्कम संघ देखील तयार केला होता. मेगा लिलावात लखनऊने मोहसिन खान (Mohsin Khan) याला २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. त्याने स्वतःच्या पदार्पणाच्या हंगामात ९ सामने खेळले आणि यामध्ये १४ विकेट्स घेतल्या. लखनऊला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी मोहसिन खानची भूमिका महत्वाची ठरली.
आयुष बदोनी (लखनऊ सुपर जायंट्स)
युवा फलंदाज आयुष बदोनी (Ayush Badoni) आयपीएल २०२२च्या मेगा लिवाता २० लाख रुपयांमध्ये विकला गेला. लखनऊ सुपर जायंट्सने त्याच्यावर बोली लावली आणि त्यांना एक गुणवंत फलंदाज मिळाला. त्याने हंगामात खेललेल्या १३ सामन्यांमध्ये १६१ धावा केल्या. लखनऊसाठी त्याने काही महत्वाच्या सामन्यांचा उत्कृष्टपणे शेवट केला. एका सामन्यात त्याने ९ चेंडूत १९, तर एका सामन्यात ३ चेंडूत १९ धावा केल्या. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ४१ चेंडूत ५४ धावांची महत्वपूर्व खेळी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यावर्षी टोटल फेल गेलेली मुंबई इंडियन्स पुढच्या वर्षी कमबॅक करणार का?
पर्पल कॅप जिंकणाऱ्या पठ्ठ्याला त्यादिवशी खाली बसवलं गेलं, नाहीतर दिल्ली आयपीएल चॅम्पियन बनली असती
युझीचा ‘किल्लर’ लूक, टीम इंडियात पुनरागमन करण्याआधी चहलने केली नवी हेयरस्टाईल