---Advertisement---

अफलातून! वेगाने धावा करत असलेल्या पाटीदारचा काळ बनला चौधरी; चित्त्याच्या चपळाईने झेल घेत धाडले तंबूत

Mukesh-Choudhary
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने बुधवारी (०४ मे) पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघापैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले. आयपीएल २०२२मधील ४९व्या सामन्यात बेंगलोरने विजयासाठी आसुसलेल्या चेन्नईला १३ धावांनी धूळ चारली. असे असले, तरीही सामन्यादरम्यान चेन्नईच्या खेळाडूने घेतलेल्या झेलाची चर्चा जोरदार रंगली आहे. इतकंच नाही, तर सोशल मीडियावर यादरम्यानचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने फलंदाजीला आमंत्रित केले होते. यावेळी बेंगलोर संघाकडून ५व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रजत पाटीदारने (Rajat Patidar) धावा चोपत संघाच्या धावसंख्येत भर पाडली.

चेन्नईकडून १६वे षटक टाकण्यासाठी ड्वेन प्रिटोरियस (Dwayne Pretorius) आला होता. हे सामन्यातील त्याचे पहिलेच षटक होते. यावेळी त्याच्यावर दबाव आणण्याच्या प्रयत्नात पाटीदारने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला आणि चेंडू हवेत गेला. हा चेंडू झेलण्यासाठी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) धाव घेत शानदार डाईव्ह मारत हा कठीण झेल घेतला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

चौधरीच्या या झेलानंतर समालोचकही त्याची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनी तोंडभरून चौधरीचे कौतुक केले. पाटीदारने यावेळी फलंदाजी करताना १५ चेंडूत २१ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला. त्याला अधिक धावा करता आल्या असत्या, पण क्षेत्ररक्षण करत असलेल्या चेन्नईच्या मुकेश चौधरीने त्याला संधीच दिली नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मुकेश चौधरी ठरला महागडा
चौधरीने हा उत्कृष्ट झेल घेतला असला, तरीही तो या सामन्यात गोलंदाजी करताना महागडा ठरला. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना ३० धावा दिल्या. अशाप्रकारे, त्याने एका षटकात १० च्या सरासरीने ३० धावा दिल्या.

सामन्याचा आढावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ८ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या होत्या. यावेळी बेंगलोरकडून महिपाल लोमरोरने सर्वाधिक ४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्स संघाला हे आव्हान पार करता आले नाही. त्यांना ८ विकेट्स गमावत १६० धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना हा सामना १३ धावांनी गमवावा लागला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनीने बेंगलोरविरुद्धच्या पराभवाचं खापर कुणावर फोडले? म्हणाला, ‘गुणतालिकेऐवजी चुकांवर लक्ष देण्याची गरज’

माझा होशील का? चेन्नई-बेंगलोर सामन्यात मुलीने सर्वांसमोर केले मुलाला प्रपोज, Video तुफान Viral

मोईन अलीचा मॅजिक बॉल, बॅट- पॅडच्या मधून जात चेंडूने उडवल्या यष्ट्या; खुद्द विराटही पाहातच राहिला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---