---Advertisement---

विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी ज्या मैदानावर घेतले क्रिकेटचे धडे, त्यालाच ठोकले ताळे

Prithvi-Shaw-Virat-Kohli-Suryakumar-Yadav-Wridhhiman-Saha-Mohammad-Shami
---Advertisement---

ज्या मैदानावर पृथ्वी शॉ, यशस्वी जयसवाल आणि शिवम दुबे सारखे खेळाडू घडले त्या मैदान आता कुलुपबंद झाले आहे. हे मैदान आहे मुंबईतील सांताक्रूजमधील एयर इंडिया ग्राउंड. या मैदानावर पृथ्वी आणि यशस्वी या खेळाडूंनी आपल्या फलंदाजीचे कौशल्य आजमावले तेच आता बंद पडले आहे. एवढेच नाही तर श्रीलंकेचा दिग्गज चमिंडा वास (Chaminda Vaas) यानेही याच मैदानावर कोचिंग कॅम्प लावला होता.

या मैदानाचा मालकी हक्क मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) यांच्याकडे आहे. या मैदानावर मागील वर्षी अदानी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) गटाने काबिज केले होते. यामुळे एमआयएएलने याला कुलुप लावत येथे पुढील होणाऱ्या हालचालीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची नोटीस बजवली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, एयर इंडिया क्षेत्रिय निर्देशक रवि बोधाडे यांनी म्हटले, “या मैदानाचा हक्क विमानतळाला दिला आहे. या मैदानावर आता कोणतीही हालचाल होणार नाही, किंवा झाली तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याबाबत आम्ही येथिल पोलीसांना देखील कळवले आहे.”

है मैदान मुंबईच्या मध्यभागी असल्याने या मैदानावर हजारो मुले रोज क्रिकेटचा सराव करत होते. सरावासाठी ६० नेट असून आता ते बंद पडल्याने त्या युवा खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे मैदान युवा खेळाडूंसाठी सोईस्कर देखील पडत होते, मात्र आता हे बंद केल्याने त्या युवा खेळाडूंना २२ किमी दूर असलेल्या दक्षिण मुंबईमध्ये जावे लागणार आहे. या मैदानावर क्रिकेटव्यतिरिक्त बाकी खेळांचेही सराव केले जातात

या मैदानावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन, दिग्गज रणजी खेळाडू वसिम जाफर (Wasim Jaffer) यांनीही क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. हे मैदान बंद पडल्याने निराश झालेले जाफर म्हणाले, “भविष्यातील क्रिकेटपटूंसाठी हे मैदान एक पाईपलाईनसारखे आहे. जर हे बंद पडले तर खेळाडूंचा सप्लायही थांबणार आहे.”

एयर इंडियाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज आशुतोष दुबे म्हणाला, “इथे ६२ नेट लावले जातात, त्यामध्ये हजारो युवा खेळाडू त्यांचा सराव करतात. तसेच शूटींग, टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या खेळांचाही सराव केला जायचा.हे मैदान दोन बाजूंना जोडण्याचे काम करते.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

काय ती स्टाईल, काय तो ऍटिट्यूड! विराट कोहलीचा लॉर्ड्सच्या मैदानावर जातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

सिंगापूर ओपन २०२२: सायना, प्रणोय फेल तर सिंधूची सेमी फायनलमध्ये धडक

लॉर्ड्स वनडेत ‘हे’ पाच जण ठरले विलन, भारताच्या लाजिरवाण्या पराभावासाठी आहेत कारणीभूत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---