देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी 2022-2023 भारतातील विविध शहरांमध्ये खेळली जात आहे. गुरुवारी (22 डिसेंबर) स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचा तिसरा दिवस संपन्न झाला. यामध्ये मुंबई, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक व गुजरात या संघांनी विजय साजरे केले.
मुंबईने हैदराबादचा एक डाव आणि 217 धावांनी पराभव केला. मुंबईच्या 651/6 या धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ पहिल्या डावात 213 धावांवर सर्वबाद झाला. यानंतर, फॉलोऑनचा पाठलाग करताना त्यांचा डाव केवळ 220 धावांत गुंडाळला गेला. मुंबईसाठी शम्स मुलानीने सामन्यात 11 बळी घेतले, तर तनुष कोटियनने दुसऱ्या डावात 5 बळी घेतले.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1605851236720267264?t=t1kES_VgjR4Mqn78CNT4zQ&s=19
कर्नाटकने पुद्दुचेरीचा एक डाव आणि 7 धावांनी पराभव केला. पहिल्या डावात 134 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर पुद्दुचेरी संघ दुसऱ्या डावात 127 धावांत सर्वबाद झाला. कर्नाटकच्या रोनित मोरेने सर्वाधिक 4 बळी घेतले. या सामन्यात कर्नाटकच्या तीन गोलंदाजांनी 6-6 बळी मिळवले.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात गुजरातने जम्मू-काश्मीरचा 9 गडी राखून पराभव केला. पहिल्या डावात 172 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर जम्मू-काश्मीरने दुसऱ्या डावात 182 धावा केल्या. गुजरातने 11 धावांचे लक्ष्य एक गडी गमावून सहज गाठले. गुजरातच्या सिद्धार्थ देसाईने दुसऱ्या डावात 8 तर सामन्यात 14 बळी टिपले.
उत्तर प्रदेशने नागालँडचा एक डाव आणि 230 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पहिल्या डावात 415 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर नागालँडचा संघ दुसऱ्या डावात 185 धावांत सर्वबाद झाला. नागालँडसाठी श्रीकांत मुंढेने 98 धावा केल्या.
(Mumbai And Gujrat Registered Wins In Ranji Trophy 2022-2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चलनी नोटांवर शोभणार जगज्जेता मेस्सी? अर्जेंटिना सरकार लवकरच घेऊ शकते निर्णय
“म्हणून मी कर्णधार म्हणून धोनीची शिफारस केली”, 15 वर्षानंतर सचिनने केला खुलासा






