मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रतिवर्षी जवळपास ६०ते ७० संलग्न संस्थाच्यावतीने विविध गटाच्या स्पर्धा भरवण्यात घेण्यात येतात. यंदा हे शिबीर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावा-शेवा, उरण जिल्हा रायगड येथे घेण्यात आले. या शिबिराचा लाभ मुंबईच्या ८३पंचांनी घेतला. शिबिराचे उदघाटन जे एन पी टि चे श्री दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये तसेच राज्य व अखिल भारतीय स्तरावरील सामन्यावर देखील मुंबईच्या पंचाची नेमणूक करण्यात येते. कबड्डी स्पर्धेत काहीवेळा नियमांचा वेगळा अर्थ लावून निर्णय दिले जातात, त्यामुळे गोंधळ निर्माण होते. पंचांमध्ये एकसूत्री पणा असावा, खेळाच्या तसेच क्रीडा प्रेमी प्रेक्षकांच्या दृष्टीने कबड्डी सामने निर्दोषपणे खेळवण्यात यावेत म्हणून पंचाना कबड्डी नियमानविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येते.
“प्रो-कबड्डीमुळे हा खेळ घराघरात पोहचला आहे. त्यामुळे पंचाना सतर्क रहाण्यासाठी अशाप्रकारची शिबिरे आयोजित करणे गरजेचे आहे.” असे उदगार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त व कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी मुंबई शहर कबड्डी असो. च्या जिल्हास्तरिय मार्गदर्शन शिबिराच्या उदघाटन प्रसंगी काढले.
या शिबिरातील पंचाना अखिल भारतीय, राज्य व जिल्हास्तरिय स्पर्धेत काम करताना नियमांच्या बाबतीत कोणतीही अडचण येऊ नये. सामने एकाच नियमाने खेळविण्यात यावे म्हणून काही ठोस निर्णय घेण्यात आले. ते लवकरच परिपत्रकाच्या माध्यमातून राज्य संघटनांना पाठविण्यात येईल. असे अखिल भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या पंच मंडळाचे समन्वयक विश्वास मोरे यांनी सांगितले.
राज्य संघटनेच्यावतीने काही अडचणीच्या नियमाबाबत विचारणा करण्यात येऊन त्यावर चर्चा करून त्याचे स्पष्टीकरण परिपत्रकात देण्यात येईल असे मोरे म्हणाले. या शिबरातील सामनाधिकाऱ्याचे विश्वास मोरे, मनोहर इंदुलकर, शशिकांत राऊत यांनी प्रबोधन केले व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिली.
याप्रसंगी अखिल भारतीय हौशी कबड्डी संघटनेच्या पंच मंडळाचे समन्वयक व मुंबई शहर कबड्डी असो.चे प्रमुख कार्यवाहक विश्वास मोरे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच समितीचे अध्यक्ष मनोहर इंदुलकर, व पंच मंडळाचे सचिव शशिकांत राऊत, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कामगार एकता संघटनेचे प्र. कार्यवाह किरण जिकमडे,मुंबई शहरचे पंच अध्यक्ष दीपक मसुरकर, पंच सेक्रेटरी सूर्यकांत देसाई ,खजिनदार शुभांगी पाटील संयुक्त कार्यवाह राजेश पाडावे,भरत मुळे,कार्यकारणी सदस्य अंकुश पाताडे, चंद्रशेखर राणे, महेंद्र हळदणकर, अनिल केशव उपस्थित होते.
या शिबिराची संपूर्ण व्यवस्था जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व कामगार एकता संघटनेचे सेक्रेटरी किरण जिकमडे व त्यांचे सहकारी यांनी उत्तम प्रकारे केली होती.
याकरिता त्यांनी गेले कित्येक दिवस कठोर परिश्रम घेतले. मुंबई शहराच्यावतीने त्यांना स्मृतीचिन्ह देऊन खास आभार मानण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
-इशांत शर्माने दाखवला आपल्या गोलंदाजांवर ठाम विश्वास
-एमएस धोनीची फॅमीली मेंबर करत आहे मुंबई इंडियन्ससाठी चिअर