मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज यांच्यात सामना झाला. मुंबई शहर संघ 2 विजय व 2 पराभव सह तिसऱ्या स्थानी होता. तर त्याने संघ 1 विजय, 3 पराभव सह सातव्या स्थानी होता. दोन्ही संघांनी सामन्याची सुरुवात अंत्यत शांत गेली होती. 17 व्या मिनिटाला 11-11 असा बरोबरीत सामना सुरू होता. त्यानंतर मात्र ठाणे संघाने दोन सुपर टॅकल करत मध्यांतरला 15-12 अशी आघाडी मिळवली.
मध्यांतरा नंतर दोन्ही संघांनी सावध खेळ करत सामना कोणाच्याही बाजूला जाऊ दिला नाही. दोन्ही संघाची बचावफळी अंत्यत संयमी खेळ करताना दिसत होती. शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना 22-22 असा सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर मुंबई शहराच्या जतिन विंदे ने 6 गुणांची सुपर रेड करत सामान्याला कलाटणी दिली. ठाणे संघाला ऑल आऊट करत मुंबई शहर ने 31-23 अशी आघाडी मिळवली.
जतिन विंदेच्या या खेळीने ठाणे संघाला सावरता आले नाही. मुंबई शहर ने 38-28 अशी बाजी मारत तिसरा विजय मिळवला. जतिन विंदे ने 12 गुणांची अष्टपैलू व निर्यायक खेळी केली. तर कर्णधार हर्ष लाड ने 7 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. ठाणे संघाकडून चिन्मय गुरव ने 8 गुण तर गौरव पाटील व रोहन तुपारे ने प्रत्येकी 4 पकडी केल्या. (Mumbai City Maurya Mavericks beat Thane)
बेस्ट रेडर- जतिन विंदे, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
बेस्ट डिफेंडर- हर्ष लाड, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
कबड्डी का कमाल- जतिन विंदे, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
SRHvDC| नाणेफेक जिंकत दिल्लीची प्रथम फलंदाजी, वॉर्नर 4 वर्षानंतर खेळणार हैदराबादमध्ये
प्रमोशन फेरीत कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाचा चौथा विजय