क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये आज ‘ब’ गटातील लढती संपल्या. ‘ब’ गटातुन ठाणे हम्पी हिरोज, नांदेड चांबल चॅलेंजर्स, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स व नाशिक द्वारका डिफेंडर्स यासंघानी प्रमोशन व प्ले-ऑफस साठी आपला प्रवेश निश्चित केला. तर उर्वरित संघ रेलीगेशन मध्ये उद्यापासून खेळतील.
आज झालेल्या लढतीत नाशिक द्वारका डिफेंडर्स संघाने नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाला नमवत तिसरा विजय मिळवला. नाशिक संघाने 45-33 असा विजय मिळवला. आकाश शिंदे सलग चौथा सुपर टेन पूर्ण केला. तर नंदुरबार कडून तेजस काळभोर ने सुपर टेन पूर्ण केला.
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई शहर ने 82-19 असा विजय मिळवत धुळे संघाचा अक्षरशः धुव्वा उडवला. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने 26 गुण मिळवले तर साहिल राणे ने अष्टपैलू खेळ केला. जतिन विंदे उत्कृष्ट चढाया करत 8 गुणांची कमाई केली.
ठाणे हम्पी हिरोज विरुद्ध परभणी पांचाला प्राईड चांगली लढत बघायला मिळाली. परभणी संघाने 38-34 असा सामना जिंकला मात्र त्याना टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यात अपयश आले. परभणी ने सामना 7 गुणांनी जिंकला असता तर परभणी संघ थेट टॉप 4 मध्ये प्रमोशन फेरी खेळण्यासाठी पात्र ठरला असता. तर आमच्या शेवटच्या सामन्यात नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने रत्नागिरी अरावली ॲरोज संघाला 56-23 असा नमवत ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले. (Mumbai City Maurya Mavericks, Nashik Dwarka Defenders team qualified for promotion round)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब-गुजरात सज्ज! नाणेफेक जिंकत हार्दिकचा गोलंदाजीचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाकडून पृथ्वी शॉला नोटीस! सपना गिल प्रकरण भोवणार, वाचा सविस्तर