‘ब’ गटातील दुसरा सामना मुंबई शहर मौर्य मेवरीक्स व नंदुरबार हिमालयन ताहर्स यांच्यात लढत झाली. दोन्ही संघांनी सावधान सुरवात केली. पहिल्या दहा मिनिटात 7-5 अशी 2 गुणांची आघाडी मुंबई शहर संघाकडे होती. दोन्ही संघाच्या बचावफळी उत्कृष्ट खेळाचा नमुना दाखवत होती.
मध्यंतरा पर्यत दोन्ही संघ तिसऱ्या चढाई वर खेळ खेळत होते. कोणताही संघ धोका पत्कारत नव्हता. मध्यंतराला 12-10 अशी 2 गुणांची आघाडी मुंबई शहर संघाकडे होती. मुंबई शहर कडून निखिल पाटील व रुतिक पाटील यांनी चांगल्या पकडी केल्या. तर नंदुरबार कडून श्रेयस उमरदंड व अतुल राठोड मध्यंतरा पर्यत 4-4 पकडी केल्या होत्या.
मध्यंतरा नंतर मुंबई शहर ने आक्रमक खेळ करत चांगली आघाडी मिळवली. शार्दूल पाटीलच्या 4 गुणांच्या सुपर रेड ने 25-15 अशी आघाडी मिळवून दिली. 2 मिनिटं शिल्लक असताना नंदुरबारच्या ओमकार गाडे ने 2 गुण मिळवत मुंबई शहरला ऑल आऊट करत सामन्यात चुरस वाढवली. मुंबई शहर ने 31-27 असा विजय मिळवला. शार्दुल पाटील ने सुपर टेन करत उत्कृष्ट खेळाचा नमुना दाखवला. साई चौगुले व राज आचार्य यांनी चांगली साथ दिली. नंदुरबार कडून ओमकार गाडे ने सर्वाधिक 7 गुण तर अतुल राठोड ने हाय फाय पूर्ण केला.
बेस्ट रेडर- शार्दूल पाटील, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
बेस्ट डिफेडर्स- अतुल राठोड, नंदुरबार हिमालयन ताहर्स
कबड्डी का कमाल- शार्दूल पाटील, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या ‘अ’ गटातील 4 संघ प्रमोशन व प्ले-ऑफस साठी पात्र
कित्येक अफगाणी आयपीएल खेळले, पण ‘ही’ कामगिरी फक्त गुरबाजलाच जमली, तुम्हीही कराल कौतुक