कोरोना व्हायरसचे पडसाद आपल्याला जगभर पहायला मिळत आहेत. भारतात 85 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर 2 लोकांना या व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
ही परिस्थिती पाहता मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या अंतर्गत असलेले सर्व क्रिकेट सामने 31 मार्चपर्यंच स्थगित केले असल्याची माहिती दिली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की कोविड-19 चा (कोरोनाव्हायरस) धोका लक्षात घेता 14 मार्च ते 31 मार्च 2020 दरम्यान होणारे सर्व क्रिकेट सामने मुंबई क्रिकेट असोसिएशनने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’
त्याचबरोबर देशांतर्गत बरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांनाही कोरोना व्हायरसचा (Corona Virus) फटका बसला आहे. यामध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका, आयपीएल आणि रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचाही समावेश आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
– कोरोना इफेक्ट: कॅप्टन कोहलीचा चाहत्यांना खास संदेश
– कोरोनाने अवघड केलं! धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सलाही बसला फटका
– भारत-द. आफ्रिका वनडे मालिकेपाठोपाठ ‘ही’ मोठी मालिकाही झाली…