इंदोर | सईद मुश्ताक अली स्पर्धेत आज मुंबई संघाने सिक्कीम विरुद्ध २० षटकांत ४ बाद २५८ धावांचा डोंगर उभा केला. यात श्रेयस अय्यरने ५५ चेंडूत १४७ धावा तर सुर्याकुमार यादवने ३३ चेंडूत ६३ धावा केल्या.
या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार सलामीवीर अजिंक्य रहाणे ११ तर कमबॅक करत असलेला पृथ्वी शाॅ १० धावांवर बाद झाले.
यानंतर सामन्याची सुत्र आपल्या हातात घेत श्रेयस अय्यरने तुफान फटकेबाजी केली. ५५ चेंडूत त्याने १५ षटकार आणि ७ चौकारांची बरसात केली. तर दुसऱ्या बाजूला सुर्याकुमार यादवने २ षटकार आणि ८चौकारांची बरसात केली.
शेवटच्या ४ षटकांत मुंबईला केवळ २३च धावा करता आल्या. केवळ ६ धावांनी मुंबईचा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला. परंतु श्रेयस अय्यरने मात्र भारतीयांकडून टी२०मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला.
यापुर्वी रिषभ पंतने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध दिल्लीकडून १२८ धावांची खेळी केली होती.