इंडियन प्रीमिअर लीगचा १५वा हंगाम जवळपास अर्ध्यापर्यंत पोहोचला आहे. मात्र, मुंबई इंडियन्स संघाने अजूनही गुणतालिकेत आपले खाते उघडलेले नाही. मुंबई संघ यंदाच्या हंगामात खराब कामगिरी करत आहे. त्यांनी आतापर्यंत ६ सामने खेळले असून त्यात एकाही सामन्यात त्यांना विजयाचं खातं खोलता आले नाहीये. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाला आपल्या या परिस्थितीमुळे अनेक चाहत्यांच्या आणि क्रिकेटमधील दिग्गजांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
शनिवारी (दि. १६ एप्रिल) झालेल्या आयपीएलच्या २६व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) १८ धावांनी पराभव केला. हा त्यांचा या हंगामातील सलग सहावा पराभव होता. या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने (Aakash Chopra) आपल्या युट्यूब चॅनेलवर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. हा हंगाम तसा चांगलाच आहे. तुम्ही अजूनही ८ सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र होऊ शकता, पण पहिल्या ६ सामन्यात एकही सामना जिंकता आला नाही, तर पुढचे ८ सामने कुठे जिंकणार?”
मुंबईला पाच वेळा विजेतेपद मिळून देणाऱ्या रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) त्याने असं म्हणलं आहे की, “रोहित शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला, तो पुन्हा पुन्हा लवकर बाद होत आहे. तो फॉर्मसाठी नाही, तर धावांसाठी लढत आहे. या ६ सामन्यांत त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. तो प्रत्येक सामन्यात चांगला खेळताना दिसतो, पण तो लवकरच बाद होतो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
अजूनही जर मुंबई ला प्ले-ऑफचा पल्ला गाठायचा असेल, तर त्यांना उरलेल्या हंगामात आपले ८ पैकी ८ सामने जिंकावे लागतील. दरवर्षी आयपीएलचा हंगाम दणाणून सोडणारी मुंबई गुणतालिकेच्या तळाला असून कमबॅकची चिन्हे धूसर दिसत आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अरे कमीत कमी आयपीएल कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे’, मुंबईच्या सलग ६ पराभवानंतर रोहितवर भडकले चाहते
बेंगलोरविरुद्धचे ‘ते’ षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा
ग्राउंड्समनच्या मुलाला जेव्हा धोनीने दिला मोलाचा सल्ला, ‘ऑफ स्पिनर्सला टी२० मध्ये सर्वच मारतात, पण…’





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा