---Advertisement---

इशान किशनची आयपीएल २०२०मधील कामगिरी एकदा पाहाच, तुम्हालाही वाटेल…

On: गुरूवार, नोव्हेंबर 5, 2020 10:11 PM
---Advertisement---

दुबईत गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आयपीएल प्ले ऑफच्या क्वॉलिफायर १चा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी केलेल्या मुंबई इंडियन्स संघाने ५ बाद २०० धावा केल्या. यामध्ये मुंबईकडून सूर्यकुमार यादव व इशान किशनने शानदार अर्धशतकी खेळी केली. इशानची आयपीएल २०२०मधील ही चौथी अर्धशतकी खेळी होती.

१५ पैकी १३ सामन्यात या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या इशान किशनने ११ वेळा फलंदाजी करताना ५३.६६च्या सरासरीने ४८३ धावा केल्या. यात त्याने ३३ चौकार व २९ षटकार मारण्याचा पराक्रम केला. इशानने पहिल्याच सामन्यात ९९ धावा केल्या होत्या. त्यानंतर २८, ३१, ०, २८, ७, नाबाद ६८, ३७, २५, नाबाद ७२, ३३ व नाबाद ५५ अशा धावा केल्या आहेत. आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इशान चौथ्या स्थानावर आहे.

आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही इशान किशनच्या नावावर
इशानने आयपीएल २०२०मध्ये १२ डावांत फलंदाजी करताना २९ षटकार मारले आहेत. आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर संजू सॅमसन असून त्याने २६ षटकार मारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-ये गड्डी नही रुकेगी! गेल- पोलार्डला मागे टाकत इशान किशनचा मोठा पराक्रम

-आई फक्त तुझ्याचमुळे! मुंबईच्या इशान किशनने फलंदाजीचे श्रेय दिले आईला

-अबब! आर्चरने इशान किशनचा घेतलेला झेल पाहून सगळ्यांच्याच बत्त्या झाल्या गुल

ट्रेंडिंग लेख-

-आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!

-‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

-हॅप्पी बर्थडे विराट …!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---