बीसीसीआयने यावर्षी पहिल्यांदाच वुमेंस प्रीमियर लीगचे (महिला आयपीएल) आयोजन करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (13 फेब्रुवारी) पहिल्या डब्ल्यूपीएलसाठी मुंबईत खेळाडूंचा लिलाव पार पडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीतला खरेदी करण्यासाठी 1.80 लाख रुपये खर्च केले.
KLASSIC KAUR 🔨 180L ☑️ #OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPLAuction pic.twitter.com/u3Qk3998HE
— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2023
हरमनप्रीत कौर भारतीय संघाची दिग्गज फलंदाज आणि मागच्या मोठ्या काळापासून कर्णधार राहिली आहे. तिच्या नेतृत्वात भारताने अनेक मालिका जिंकल्या आहेत. वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरमनप्रीत कौर भारताची आघाडीची रन स्कोरर आहे. हरमनप्रीतने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी 124 सामने खेळले आहेत आणि यात 3322 धावा केल्या आहेत. वनडेत तिची सरासरी 38.18 राहिली असून स्ट्राईक रेट 73.13 राहिली आहे. हरमनप्रीतने वनडे क्रिकेटमध्ये पाच शतक, तर 17 अर्धशतक ठोकले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हरमनप्रीतची आकडेवारी चांगली आहे. तिने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 147 सामने खेळले असून 2956 धावा केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये हरमनप्रीतच्या नावावर 1 शतक आणि 9 अर्धशतकांची नोंद आहे. या धावा तिने 28.15 च्या सरासरीने आणि 73.13 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत.
त्याव्यतिरिक्त भारतीय महिला संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदा स्मृती मंधाना () हिला देखील डब्ल्यूपीएल लिलावात मोठी रक्कम मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझीने स्मृती मंधानाला खरेदी करण्यासाठी 3.40 कोटी रुपये खर्च केले. ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू एलिस पेरी (Smriti Mandhana) हिला देखील आरसीबीनेच 1.70 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. (Mumbai Indians bought Harmanpreet Kaur in Women’s IPL auction)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेमिमाह रॉड्रिग्जने उचलला पंचांच्या चुकीचा पुरेपूर फायदा, पाकिस्तानने गमावला विश्वचषकातील पहिला सामना
मोठी बातमी! वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती