---Advertisement---

रोहित पुन्हा एकदा चुकीच्या निर्णयाचा शिकार! तिसऱ्या पंचांनीच केली अक्षम्य चूक

---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स दमदार कामगिरी करताना दिसत आहे. मुंबईने मंगळवारी (9 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पराभूत करत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनवणारा रोहित शर्मा यावर्षी मात्र कमाल दाखवू शकला नाहीये. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात रोहित पुन्हा एकदा अपयशी ठरला. रोहितने या सामन्यात अवघ्या 7 धावा करून विकेट गमावली. मात्र, आता त्याच्या बाद होण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.

मुंबई इंडियन्सला या सामन्यात विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 200 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र रोहित 8 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. त्याला फिरकीपटू वनिंदू हसरंगा याने पायचित पकडले. मात्र, नियमानुसार रोहित बाद नसल्याचे आता समजून घेत आहे.

https://twitter.com/munafpa99881129/status/1656006261597691904?t=A_7D3Duhr1Cr2jLwZb5KBA&s=19

रोहितच्या पॅडवर चेंडू लागल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. मात्र, पंचांनी त्याला नाबाद ठरवलं. यावर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने तिसऱ्या पंचांची मदत घेण्यासाठी डीआरएस वापरला. रोहित तिन्ही स्टम्प्ससमोर असल्याने तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय बदलत त्याला बाद ठरवले. मात्र, त्यावेळी रोहित क्रीजच्या बराच बाहेर असल्याचे दिसून आले.

क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाज तेव्हाच पायचित होऊ शकतो जेव्हा तो स्टम्प्सपासून 3 मीटर आतमध्ये असेल. व्हायरल होत असलेल्या छायाचित्रानुसार रोहित हा 3.7 मीटर इतक्या अंतरावर आहे. त्यामुळे रोहितला बाद देणे हे चुकीचे ठरते. यामुळे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी तिसऱ्या पंचांवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू व मुनाफ पटेल यांनी देखील ट्विट करत याबाबत उघड नाराजी व्यक्त केली.

(Mumbai Indians Captain Rohit Sharma Again Controversial Dismissal This Time 3rd Umpire Fail)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली बाहेर होणार की चेन्नई ठरणार वरचढ? आयपीएल 2023 मध्ये बुधवारी निर्णायक झुंज 
मैं हू ना! 200 धावा चेस करताना सूर्या तळपतोच, पाहा ही जबरदस्त आकडेवारी 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---