---Advertisement---

आले रे आले, मुंबईकर आले! कर्णधार रोहितसह बुमराह आणि सूर्यकुमारची युएईत एन्ट्री- VIDEO

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 10:01 AM
---Advertisement---

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमधील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना पार पडणार होता. परंतु सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. ज्यामुळे भारतीय संघात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या खेळाडूंनी अंतिम सामना खेळण्यास नकार दिला होता. ज्यामुळे बीसीसीआय आणि ईसीबीने मिळून हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

अंतिम कसोटी सामना रद्द झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खेळण्यासाठी युएईकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. शनिवारी (११ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स संघातील काही प्रमुख खेळाडूंनी यूएईमध्ये हजेरी लावली आहे.

येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेकरिता ५ वेळेस आयपीएल स्पर्धेचे विजेते मुंबई इंडियन्स संघाने जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान शनिवारी पलटनमध्ये कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांनी देखील हजेरी लावली आहे. या खेळाडूंना ६ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. या खेळाडूंचा विलगीकरणाचा कालावधी १७ सप्टेंबर रोजी समाप्त होईल.

मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव आपल्या पत्नींसह हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत.

मुंबई इंडियन्स संघातील हे प्रमुख खेळाडू चार्टर्ड विमानाने युएईला पोहचले आहेत, ज्याची माहिती मुंबई इंडियन्स संघाने दिली होती. तर युएईला रवाना होण्यापूर्वी या खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती, ती निगेटिव्ह आली होती. तसेच युएईला पोहचल्यानंतर देखील या खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे, ती चाचणी देखील निगेटीव्ह आली आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1436733975964237826?s=20

https://www.instagram.com/p/CTr-An5KQ4a/?utm_medium=copy_link

 

मुंबई इंडियन्स संघातील इतर खेळाडूंनी ६ सप्टेंबर रोजी युएईमध्ये हजेरी लावली होती. तसेच त्यांनी जोरदार सराव करायला देखील सुरुवात केली आहे. ५ वेळेस आयपीएलचे जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ ६ वे जेतेपद आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अंतिम कसोटी सामना रद्द झाल्यानंतर ईसीबीचे आयसीसीला पत्र, जाणून घ्या काय लिहिले होते त्यात

आयपीएलमधून माघार घेतलेल्या मलान अन् बेयरस्टोच्या जागी ‘या’ खेळाडूंना संधी, एकटा MI चा जुना शिलेदार

ज्या देशाच्या दौऱ्यावर आतंकी हल्ल्यात लागली होती गोळी, आज त्याच देशात प्रशिक्षक बनून गेला ‘हा’ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---