मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने १९ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्याआधी अबू धाबीमध्ये सराव सुरू केला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात दुबईत होणाऱ्या या मोठ्या सामन्याने होईल. भारतीय संघासह इंग्लंड दौरा संपवून यूएईमध्ये आलेल्या रोहित शर्माला ६ दिवस विलगिकरनात ठेवण्यात आले आहे. म्हणूनच रोहित त्याच्या अबुधाबी येथील संघाच्या हॉटेलमध्ये विलगिकरणात असताना ट्रेडमिलवर घाम गाळत आहे.
मुंबई इंडियन्सने आपल्या या सुपरस्टार खेळाडूचे सराव करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव त्यांच्या कुटुंबियांसह शनिवारी सकाळी चार्टर्ड विमानाने मँचेस्टरहून अबू धाबीला पोहोचले होते.
अबू धाबीला जाण्यापूर्वी या तीन भारतीय खेळाडूंचा कोविड अहवाल मँचेस्टरमध्ये निगेटिव्ह आला होता. परंतु प्रोटोकॉलनुसार, सध्या त्यांना सहा दिवसांच्या विलगिकरणाच्या कालावधीतून जावे लागेल.
🅀🅄🄰🅁🄰🄽🅃▒▒▒ 👀#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @ImRo45 pic.twitter.com/UqTYdgLVWf
— Mumbai Indians (@mipaltan) September 14, 2021
तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये होणारी पाचवी कसोटी रद्द करण्यात आली होती. बीसीसीआय आणि ईसीबीने शेवटची कसोटी आयोजित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. परंतु भारतीय शिबिरात कोविडचा शिरकाव झाल्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान पाच वेळा आयपीएल चषक विजेता संघ मुंबई इंडियन्सने पहिल्या टप्प्यात खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ४ सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जचा संघ आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तिसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएलचे उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत आणि स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाईल. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयला ४ मे रोजी आयपीएल २०२१ पुढे ढकलावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ पदार्थ पाहताच ‘फिटनेस किंग’ कोहलीच्या तोंडाला सुटतं पाणी, आवडत्या डिशचं नाव माहितंय का?
धोनीनंतर ‘या’ शिलेदाराला बनायचं आहे सीएसकेचा उत्तराधिकारी! इशाऱ्यांमध्ये सांगितली मनातील गोष्ट
वीरूने केली रहाणेची पाठराखण, म्हणाला “…तरच त्याला संघाबाहेर करा”