महिला प्रीमियर लीगचा पाचवा सामना आज (18 फेब्रुवारी) मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात जायंट्स (MI vs GG) संघात खेळला गेला. हा सामना कोताम्बी स्टेडियम वडोदरा येथे रंगला होता. दरम्यान या सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा 5 विकेट्सने पराभव करून महिला प्रीमियर लीगमध्ये (Women Premier League 2025) आपला पहिला विजय नोंदवला.
मुंबईच्या शानदार विजयात सर्वात मोठे योगदान नॅट सायव्हर-ब्रंटचे (Nat Sciver-Brunt) होते, तिने फलंदाजीत अर्धशतक झळकावून 55 धावा केल्या आणि गोलंदाजीत 2 विकेट्स आपल्या नावार केल्या. आता मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत मुसंडी मारत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो त्यांच्यासाठी योग्य ठरला. कारण त्यांच्या गोलंदाजांनी गुजरातच्या अर्ध्या संघाला 43 धावांवर तंबूत पाठवले. हरलीन देओलने (Harleen Deol) 32 धावा आणि काशवी गौतमने (Kashvee Gautam) 20 धावा करून गुजरातला 120 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली.
121 धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या मुंबईने 16.1 षटकात विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली कारण हेली मॅथ्यूज 17 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर यास्तिका भाटिया देखील फक्त 4 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर देखील 4 धावा करून बाद झाली. नॅट सायव्हर ब्रंट एका टोकाला खंबीरपणे उभी राहिली आणि अमेलिया केरसोबत तिने 45 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. केर 19 धावांवर बाद झाली, पण ब्रंटच्या 57 धावांच्या शानदार खेळीमुळे मुंबईने शानदार विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे’ 3 स्टार फिरकीपटू चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये आपल्या संघासाठी ठरणार ‘एक्स-फॅक्टर’?
“पाकिस्तानचा 10 वर्षाचा वनवास संपला” चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी काय म्हणाला पाकिस्तानी कर्णधार?
भारत, ऑस्ट्र्र्रेलियाला जमलं नाही ते अमेरिकेने करून दाखवलं! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास