---Advertisement---

भारत, ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते अमेरिकेने करून दाखवलं! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास

AMERICA
---Advertisement---

क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये अनेक आश्चर्यकारक रेकाॅर्ड बनले आहेत. तत्पूर्वी वनडे क्रिकेटच्या इतिहासात, अनेक अव्वल संघ एकामागून एक आश्चर्यकारक रेकाॅर्ड रचताना दिसले आहेत. पण भारत-ऑस्ट्रेलिया सारख्या अव्वल संघांना या फॉरमॅटमध्ये जे साध्य करता आले नाही, ते अमेरिकन गोलंदाजांनी साध्य केले आहे. नवजात अमेरिकेने सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करताना सामना जिंकून इतिहास रचला. ही कामगिरी करणारा अमेरिका हा पहिला संघ असल्याचे सिद्ध झाले आहे.

मंगळवारी (18 फेब्रुवारी) येथे झालेल्या क्रिकेट वर्ल्ड लीग टू सामन्यात अमेरिकेने ओमानचा 57 धावांनी पराभव केला आणि वनडे सामन्यात पूर्ण 50 षटकांत 122 धावांचा सर्वात कमी धावसंख्या राखण्याचा रेकाॅर्ड बनवला. पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये बचाव केलेली हा सर्वात कमी धावसंख्या आहे. पण, यामध्ये कमी षटकांचे सामने किंवा सुधारित लक्ष्य असलेले सामने समाविष्ट नाहीत.

पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये ओमानची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. संपूर्ण सामन्यात वेगवान गोलंदाजांनी एकही षटक टाकले नाही. ओमानने 5 फिरकीपटू मैदानात उतरवले तर अमेरिकेने केंजीगे, मिलिंद, यासिर आणि हरमीत हे फिरकीपटू मैदानात उतरवले. तत्पूर्वी, मिलिंदच्या 47 धावांच्या खेळीमुळे अमेरिकेने 35.3 षटकांत 122 धावा केल्या होत्या.

डावखुरा फिरकीपटू नोशातुश केंजीगेने 11 धावांत 5 विकेट्स घेतल्या. याच्या फिरकी जादूच्या बळावर अमेरिकेने फिरकीला अनुकूल परिस्थितीत यजमान ओमानला फक्त 65 धावांत गुंडाळले. केंजीगे व्यतिरिक्त, ऑफस्पिनर मिलिंद कुमारने 17 धावात 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तर यासिर मोहम्मदने 10 धावात 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

चॅम्पियन्स ट्राॅफीच्या इतिहासात किती वेळा भिडले भारत-पाकिस्तान? कोणी गाजवले वर्चस्व?
चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये 3 अष्टपैलू खेळाडू घालणार धूमाकूळ! भारतासाठी हार्दिक पांड्या ठरणार ट्रम्प कार्ड?
चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास: कशी झाली सुरुवात आणि का खेळतात फक्त आठ संघ?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---