यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची (ICC Champions Trophy 2025) क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण उद्यापासून (19 फेब्रुवारी) चॅम्पियन्स ट्राॅफीचा थरार रंगणार आहे. 2017 नंतर, या स्पर्धेची क्रेझ पुन्हा एकदा वाढणार आहे. पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ पूर्णपणे सज्ज आहेत.
दरम्यान आशियाई खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहेत, त्यामुळे सर्व संघांच्या फिरकीपटूंवर विशेष जबाबदारी असेल. या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व संघांकडे मजबूत फिरकी गोलंदाजीची आक्रमण आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण त्या 3 फिरकीपटूंबद्दल जाणून घेऊया, जे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या संघासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकतात.
1) वरुण चक्रवर्ती (भारत)- भारतीय क्रिकेट संघाचा गूढ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. भारताच्या या स्टार फिरकी गोलंदाजाने अलिकडच्या काळात आपल्या अद्भुत गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं आहे.
चक्रवर्तीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी आपल्या फिरकीच्या जादूने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि म्हणूनच आता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान तो या मेगा स्पर्धेत आपल्या संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो.
2) राशिद खान (अफगाणिस्तान)- अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) अनेक दिग्गज फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. तो सध्या जगातील फिरकी गोलंदाजांमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज मानला जातो. त्याने आपल्या धारदार फिरकी गोलंदाजीने जागतिक क्रिकेटवर छाप पाडली आहे.
राशिद गेल्या बऱ्याच काळापासून सातत्याने विकेट्स घेत आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याच्याकडून विशेष अपेक्षा आहेत. अलिकडच्या काळात त्याचा फॉर्मही उत्कृष्ट आहे. अशा परिस्थितीत, तो आपल्या संघासाठी एक्स फॅक्टर बनू शकतो.
3) अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया)- ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा (Adam Zampa) सध्या या संघाचा सर्वात प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो एक अतिशय धोकादायक फिरकी गोलंदाज मानला जातो. त्याच्याकडे विकेट घेण्याची जबरदस्त क्षमता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झाम्पा स्पिन ट्रॅक विकेटवर आपली प्रतिभा दाखवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“पाकिस्तानचा 10 वर्षाचा वनवास संपला” चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी काय म्हणाला पाकिस्तानी कर्णधार?
भारत, ऑस्ट्र्र्रेलियाला जमलं नाही ते अमेरिकेने करून दाखवलं! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास
चॅम्पियन्स ट्राॅफीच्या इतिहासात किती वेळा भिडले भारत-पाकिस्तान? कोणी गाजवले वर्चस्व?