शारजाह। गुरुवारी (७ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ८६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह त्यांचे गुणतालिकेत ७ विजयांसह १४ गुण झाले आहेत. या विजयासह कोलकाताने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठा प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.
कोलकाताच्या विजयामुळे पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांचे आयपीएल २०२१ मधील आव्हान अधिकृतरित्या संपले आहे. तर, सनरायझर्स हैदराबाद यापूर्वीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. याबरोबरच चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी आधीच प्लेऑफमधील जागा पक्की केली आहे. त्यामुळे केवळ चौथ्या स्थानासाठी स्पर्धा होती. आता कोलकाताच्या या विजयानंतर या शर्यतीत केवळ कोलकाता आणि मुंबई इंडियन्स हे दोनच संघ उरले आहेत.
असे असले तरी मुंबईसाठी ही शर्यत खूप कठीण आहे. कारण, मुंबईने साखळी फेरीत उर्वरित एकमेव सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तरी, नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. कोलकाताच्या रनरेटला मागे टाकण्यासाठी मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करताना २०० धावा करुन हैदराबादला १७० पेक्षाही अधिक धावांनी पराभूत करावे लागेल.
तसेच जर त्यांना या सामन्यात धावांचा पाठलाग करावा लागला, तर मात्र त्यांचा नेटरनरेट कोलकातापेक्षा अधिक होणार नाही. त्यामुळे हैदराबादने प्रथम फलंदाजीसाठी उतरताच मुंबईचे आयपीएल २०२१ मधील आव्हान संपुष्टात येईल. त्याचबरोबर मुंबई जर या सामन्यात पराभूत झाले तर कोलकाता त्यांच्या गुणांच्या आधारेच प्लऑफसाठी थेट पात्र होतील.
हे समीकरण पाहाता मुंबईचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने विक्रमी ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. तसेच त्यांचे यंदा सलग तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकायचे स्वप्न होते. असे असताना, मुंबई इंडियन्सची यंदाची कामगिरी पाहाता, हा संघ अन्य संघांच्या चाहत्यांकडून ट्रोल होत आहे. त्यामुळे, सध्या अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Mi fans to ambani #KKRvRR pic.twitter.com/KwjMtMVfTJ
— Captain Jack Sparrow Fan 🇵🇸 (@Sajed4SRK) October 7, 2021
https://twitter.com/swarraj5/status/1446152619265716225
कधी कधी आपण स्वतः पण प्रयत्न केले पाहिजे, सगळं सरकारच आयतं देईल, #ऐसा_कैसे_चलेगा ?
टिप
याचा #MI च्या डिस्कोलीफिकेशनशी काही संबंध नाही. 🙏🙏— Prince Zuko 🔥 (@only_fo_r_you) October 7, 2021
Few hopeful Mumbai Indians fans about playoffs #MIPaltan #SRHVSMI #IPL2O21 pic.twitter.com/c45sVdhE3z
— Abhinav Singh (@_Abhi__tweets) October 7, 2021
Mumbai Indians fans r doing some randomly calculations for qualifying in playoffs 😂 #IPL2021 #mipaltan #MIvSRH #SRHvMI #MumbaiIndians #Playoffs pic.twitter.com/NwcGDSfiaz
— PGMINUS600UC MAIL OWNER (@its_opdata) October 7, 2021
Current scenarios!@mipaltan @ImRo45 Always a champion🏆#MIPaltan #MumbaiIndians #Playoffs #IPL2021 pic.twitter.com/vpsMgBIeNs
— Parin Dedhia (@Parin_pd90) October 7, 2021
Now Mumbai Indians know 😂 #MIPaltan#SRHvMI #KKRvsRR #IPL2021 pic.twitter.com/y6bXTUPb6x
— Bishnukant Singh (@Luffy_D_Dragen) October 7, 2021
After knowing that #mi will not qualifying this season #IPL2021
Mumbai Indians fans be like :- #mipaltan #MIvSRH #SRHvMI #MumbaiIndians #Playoffs pic.twitter.com/0MpC9sd08o— PGMINUS600UC MAIL OWNER (@its_opdata) October 7, 2021
Hey @mipaltan 😉😁#MIPaltan Ambani #mumbaiindians pic.twitter.com/FTqQ4nn5Ic
— Suresh Pilania (@Suresh_Pilania) October 7, 2021
https://twitter.com/avdhootZone/status/1446178589070659584
Karma has no menu😂😂😂#MIPaltan #Ambani #CSKvPBKS #DeepakChahar #RRvsKKR #KKRvsRR #IPL2021 #AmiKKR #IPL2O21 pic.twitter.com/Wn2Qsh3anS
— Adesh Mishra (@imAdeshMishra) October 7, 2021
https://twitter.com/politacticsguy/status/1446175644262432774
https://twitter.com/ItzpoppinSk/status/1446174532528586752
#Thankyou #MI , #PBKS. #IPL2021 | @mmonlinebet pic.twitter.com/cDhIyWiZ3u
— MM Online Service (@mmonlinebet) October 7, 2021
#KKRvRR #RRvsKKR #MI Fans who were waiting for tomorrow's match… pic.twitter.com/huPDLksDey
— زماں (@Delhiite_) October 7, 2021
https://twitter.com/dilkhushbabal7/status/1446194332453703689
Le Mumbai Indians#KKRvsRR #MumbaiIndians pic.twitter.com/OeDZGgnMd7
— आदर्श दुबे ॐ (@i_adarsh05) October 7, 2021
कोलकाताचा विजय
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताच्या शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने ७९ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. गिलने ५६ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने ३८ धावांची खेळी केली. अन्य खेळाडूंनीही छोटेखानी पण महत्त्वाच्या खेळी करत कोलकाताला २० षटकांत ४ बाद १७१ धावांपर्यंत पोहचवले.
त्यानंतर, १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी अक्षरश: कोलकाताच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. राजस्थानचा संघ १६.१ षटकात ८५ धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून केवळ राहुल तेवातियाने ४४ धावांची एकाकी झुंज दिली. कोलकाताकडून शिवम मावीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आणि लॉकी फर्ग्यूसनने ३ विकेट्स घेतल्या. तसेच, शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईचं प्ले ऑफचं स्वप्न अजूनही होऊ शकत पूर्ण, पुढच्या सामन्यात करावी लागणार ‘ही’ गोष्ट
शफाली-जेमिमाच्या फटकेबाजीने जिंकले मन; मात्र, पावसाने सामना झाला रद्द
इतिहास आहे साक्षी! ‘किंग्स’ पडतात ‘सुपरकिंग्स’ला भारी; वाचा आकडेवारी