इंडियन प्रीमिअर लीग २०२२ हंगामात मुंबई इंडियन्सने इतिहास घडवला आहे. परंतु हा इतिहास पराक्रमाचा नाही, तर निराशाजनक खेळीचा आहे. मुंबईने या हंगामात पहिले सहा सामने लागोपाठ गमावले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शनिवारी (दि. १६ एप्रिल) खेळला गेलेला सामना मुंबई इंडियन्सचा हंगामातील सहावा सामना होता, जो त्यांनी १८ धावांनी गमावला.
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यातील हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईला विजयासाठी १८ धावा कमी पडल्या आणि लखनऊने हंगामातील त्यांचा चौथा विजय मिळवला. लखनऊने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत आणि यामध्ये ८ गुणांसह त्यांचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर दुसरीकडे मुंबईला हंगामातील पहिल्या विजयासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. मुंबईने खेळलेल्या पहिल्या ६ सामन्यांपैकी एकही सामना त्यांना जिंकता आलेला नाहीये.
2⃣9⃣th IPL FIFTY for @klrahul11! 👏 👏
The @LucknowIPL captain is making his 100th IPL game special & how! 👌 👌
He & @im_manishpandey also complete a fifty-run stand as #LSG move past hundred. 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/8aLz0owuM1#TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/nuCm0xvgDy
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2022
या नकोशा कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील तिसरा संघ बनला आहे, ज्यांनी हंगामातील त्यांचे पहिले ६ सामने गमावले आहेत. मुंबईने याच्या आधीने अनेक हंगामांमध्ये हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खराप प्रदर्शन केले आहे, पण सलग ६ सामने हारण्याची संघाची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएलध्ये सर्वात आधी अशी खराब खेळी दिल्ली कॅपिटल्सने २०१३ हंगामात केली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने २०१९ मध्ये असेच नकोसे प्रदर्शन केले होते. आता २०२२ म्हणजेच आयपीएलच्या १५ व्या हंगामात हा नकोसा विक्रम नावावर केला आहे.
दरम्यान, मुंबई आणि लखनऊ यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ४ विकेट्सच्या नुकसानावर १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स मर्यादित २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १८१ धावा करू शकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
लखनऊसाठी त्यांचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुलने सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली. राहुलला ही शतकी खेळी करण्यासाठी ६० चेंडूंचा सामना करावा लगाला, ज्यामध्ये त्याने ९ चौकार आणि ५ षटकार ठोकले, तर दुसरीकडे मुंबईसाठी कायरन पोलार्ड शेवटच्या षटकांमध्ये आशेच्या किरणाच्या रूपात खेळपट्टीवर खेळत होता, पण दुष्मंता चमीराने त्याला शेवटच्या षटकात तंबूत पाठवले आणि विजय मिळवला.
एका आयपीएल हंगामात सुरुवातीचे ६ सामने लागोपाठ गमावणारे संघ
दिल्ली कॅपिटल्स – आयपीएल २०१३
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – आयपीएल २०१९
मुंबई इंडियन्स – आयपीएल २०२२*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
केएल राहुलचे शतक आणि आवेश खानची शानदार गोलंदाजी; मुंबईला १८ धावांनी नमवत लखनऊ विजयी
रुसवा, फुगवा की संधी न मिळण्यामागची निराशा? वडील सचिनच्या शेजारी तोंड पाडून बसलेला दिसला अर्जुन