Loading...

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हा खेळाडू होणार आयपीएल २०२०मधून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ श्रीलंका तसेच पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळणार नाही. याचबरोबर तो 2020 आयपीएलमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे.

बेहरेनडॉर्फ उपचारांसाठी न्यूझीलंडला लवकरच रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून 11 वनडे आणि 7 टी20 खेळलेला हा खेळाडू गेले काही वर्ष सतत दुखापतग्रस्त होताना दिसत  आहे.

2018 मध्ये त्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले होते. परंतु दुखापतीमुळेच त्य़ा हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. त्याच्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये मुंबई इंडियन्सने मोजले होते.

Loading...

आयपीएल लिलाव 19 डिसेंबर 2019 रोजी कोलकाता शहरात होणार आहे. 4 वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई संघाला या लिलावात बेहरेनडॉर्फसाठी बदली खेळाडूची निवड करावी लागणार आहे.

You might also like
Loading...