मंगळवारी (दि. 9 मे) मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला धूळ चारली. मुंबईने आयपीएल 2023 च्या 54 व्या सामन्यात आरसीबीला 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत भरारी घेत थेट तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबईच्या या विजयात अनुभवी सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांच्यासह युवा नेहल वढेरा याची भूमिका देखील निर्णायक राहिली. आपला पहिलाच हंगाम खेळत असलेल्या नेहल याची कामगिरी पाहून अनेक जण त्याचे कौतुक करत आहेत.
विजयासाठी सलग तिसऱ्यांदा 200 धावांचा पाठलाग करत असताना मुंबईला दोन मोठ्या खेळ्यांची आवश्यकता होती. ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी आपला फॉर्म कायम राखत संघाला पुढे नेले. मात्र, संघाला अंतिम रेषा पार करून देण्याचा मान नेहल वढेराने मिळवला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 34 चेंडूवर 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. हे त्याचे स्पर्धेतील दुसरे अर्धशतक ठरले. त्याने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 183 धावा केल्या आहेत. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याचे कौशल्य असून, त्याला भविष्यातील फिनिशर म्हणून पाहिले जात आहे.
सध्या केवळ 22 वर्षांचा असलेला नेहल पंजाब साठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आयपीएल लिलावात मुंबईने त्याला केवळ 20 लाखांमध्ये आपल्या ताफ्यात सामील करून घेतलेले. नेहल हा मुंबईचा अनुभव आहे फलंदाज सूर्यकुमार यादव याला गुरुस्थानी मानतो. आपण सध्या सूर्यकुमार यादवकडून बरेच काही शिकत असल्याचे कबुली त्याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यानंतर दिली.
मुंबई इंडियन्सने भारतीय क्रिकेटला आतापर्यंत जसप्रीत बुमराह, पंड्या बंधू ईशान किशन व सूर्यकुमार यादव असे अनेक दमदार क्रिकेटपटू दिले आहेत. आता तिलक वर्मा व नेहल वढेरा हे देखील सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय संघाच्या दिशेने आगेकूच करताना दिसतायेत.
(Mumbai Indians New Young Finisher Nehal Wadhera Learning From Suryakumar Yadav)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली बाहेर होणार की चेन्नई ठरणार वरचढ? आयपीएल 2023 मध्ये बुधवारी निर्णायक झुंज
मैं हू ना! 200 धावा चेस करताना सूर्या तळपतोच, पाहा ही जबरदस्त आकडेवारी