इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात या हंगामातील सलामीचा सामना रंगणार आहे. तर ३० मे रोजी अहमदाबाद येथे हंगामाची अंतिम लढत होणार आहे. तत्पुर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या पलटणमधील काही सदस्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ हे मराठी गाणे वाजत आहे. या गाण्यावर सुरुवातीला रोहित नाचताना दिसतो. त्यानंतर सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि पंड्या बंधू अर्थात हार्दिक पंड्या व कृणाल पंड्या ताल धरताना दिसतात. हा भन्नाट व्हिडिओ शेअर करत मुंबईने कॅप्शनमध्ये चाहत्यांना कोणाची डान्स स्टेप जास्त आवडली?, असा प्रश्न विचारला आहे.
चाहत्यांनीही या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी कर्णधार रोहितची डान्स स्टेप सर्वात चांगली असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांना सूर्यकुमार, बुमराह आणि पंड्या बंधूंच्या स्टेपची भुरळ पडली आहे.
https://www.instagram.com/p/CNUO4FLD_lU/?utm_source=ig_web_button_share_sheet
रोहित शर्मा कर्णधार असलेल्या मुंबईने मागीलवर्षी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला होता. त्यांनी आत्तापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० असे पाच वेळा आयपीएल जेतेपद मिळवले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांची नजर सहाव्या जेतेपदावर असणार आहे.
असा आहे मुंबई इंडियन्स संघ– रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (यष्टीरक्षक), किरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, नेथन कुल्टर नाईल, ऍडम मिल्ने, पियुष चावला, जेम्स निशम, युधविर चरक, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडूलकर
महत्त्वाच्या बातम्या-
जबराट! ‘या’ धुरंधरांनी, पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार मारत आयपीएल कारकिर्दीचा केला श्रीगणेशा
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे ३ भारतीय, रोहित नव्हे ‘हा’ धुरंधर अव्वलस्थानी
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार, बघा रोहित-धोनीसोबत आहे कोणाचे नाव