---Advertisement---

मुंबईने मनावर दगड ठेवत त्रिमूर्तीची सोडली साथ; शेअर केला ‘थँक्यू’ व्हिडिओ

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 11:53 PM
---Advertisement---

आयपीएलच्या पुढच्या वर्षीच्या हंगामात दोन नवीन संघ सामील होणार आहेत. या नवीन संघांच्या पार्श्वभूमीवर पुढच्या हंगामापूर्वी मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. मेगा लिलाव होणार असल्यामुळे पुढच्या वर्षीसाठी प्रत्येक आयपीएल फ्रेंचायझीला फक्त चार खेळाडू संघात कायम (रिटेन) ठेवून इतर सर्व खेळाडूंना लिलावासाठी उपलब्ध करून द्यावे लागले आहेत. अशात फ्रेंचायझींना अशा अनेक खेळाडूंना रिलीज (संघातून बाहेर) करावे लागले, ज्यांनी आतापर्यंत त्यांच्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. मुंबई इंडियन्सलाही इच्छा नसताना त्यांच्या संघातील अनेकांना रिलीज करावे लागले.

मुंबई इंडियन्सने पुढच्या हंगामात ज्या चार खेळाडूंना रिटेन केले. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू कायरन पोलार्डचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सने पुढच्या वर्षीसाठी खेळाडूंना रिलीज केले त्यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश होता. भारताचे हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि ईशान किशन यांनादेखील इच्छा नसताना रिलीज करावे लागले. आता याच पार्श्वभूमीवीर मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हे तिन्ही खेळाडू मजामस्ती करताना दिसत आहेत. चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडल्याचे दिसते.

मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. यामध्ये २०१९ आणि २०२० मध्ये संघाला आयपीएलचे जेतेपद जिंकवून देण्यासाठी या तिघांनी महत्वाचे योगदान दिलेले. अशात संघ व्यवस्थापनासाठी त्यांना रिलीज करणे, एक कठीण निर्णय राहिला असणार. मुंबईने त्यांना रिलीज केले असले तरी, मेगा लिवावात ते उपलब्ध असतील आणि संघ त्यांच्यावर बोली लावून त्यांना विकत घेऊ शकतो. मात्र, मुंबईला या खेळाडूंना विकत घेता येईल, याबाबत कोणीच खात्री देऊ शकणार नाही.

दरम्यान, हार्दिक पंड्याने स्वतःची एक वेगळी ओळख मुंबईसोबत खेळतानाच बनवली. त्याने मुंबई इंडियन्ससाठी १५० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने १४४३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने संघासाठी ४२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कृणालने संघासाठी ११४३ धावा आणि ५१ विकेट्स घेतल्या आहेत. तर ईशान किशनने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना आतापर्यंत ११३३ धावा केल्या आहेत आणि चांगल्या सलामीवीराची भूमिका पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---