इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात अनेक असे रोमांचक सामने झाले आहेत. जे सहसा कोणी विसरू शकणार नाही. त्यात मुंबई इंडियन्स विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात २०१४ साली झालेला सामना सर्वोच्च स्थानी असेल. या सामन्यातील, आदित्य तारेच्या बॅट मधून निघालेला तो षटकार सर्वांनाच आठवण असेल. याच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यावर राजस्थान रॉयल्स संघाने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल २०१४ च्या हंगामात, मुंबई इंडियन्स संघाने अवघ्या १४.४ षटकात १९५ धावा ठोकत, प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये आदित्य तारेने मोलाची भूमिका बजावली होती. १५ व्या षटकात, जेम्स फॉकनरने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर, तारेने षटकार मारत मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच सामना झाल्यानंतर त्याने टी शर्ट वर करून जल्लोष साजरा केला होता.
याच जुन्या आठवणींना उजाळा देत मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर तारेचा हा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून लिहिले की, “कधीच हार मानू नका. ७ वर्षांपूर्वी चेंडू सीमारेषेबाहेर गेला आणि तारेने नॉर्थ स्टँडच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर पूर्ण स्टेडियम जल्लोष साजरा करू लागला.”
𝐍𝐞𝐯𝐞𝐫. 𝐆𝐢𝐯𝐞. 𝐔𝐩. 👊
7️⃣ years ago. Ball sailed over the boundary. Tare sprinted towards the North Stand & the Wankhede went bonkers! 🤯#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/nr0WLx9IZN
— Mumbai Indians (@mipaltan) May 25, 2021
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने यावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक प्रसिद्ध मिम शेअर केले आहे. ज्यामध्ये काही लोक रडताना दिसून येत आहे. ज्यावर लिहिले आहे की,”हा भाई, माहीत आहे.”
त्या सामन्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाच्या खेळाडूंनाही अश्रू अनावर झाले होते. कारण राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्याची उत्तम संधी होती. परंतु संघातील गोलंदाजांना अपयश आल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना गमवावा लागला होता. ज्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता.
https://t.co/wbknzxDbDg pic.twitter.com/STGNby4W4y
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 25, 2021
काय झाले होते सामन्यात
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २० षटकाअखेर ४ बाद १८९ धावा केल्या होत्या. परंतु मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी १४.४ षटकात हे आव्हान गाठायचे होते. मुंबई इंडियन्स संघाने १४.३ षटकात १८९ धावा करत सामना बरोबरीत आणला होता. त्यानंतर प्ले ऑफ गाठण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला पुढील चेंडूवर चौकार किंवा षटकार मारायचा होता. स्ट्राइकवर असलेला आदित्य तारे पहिलाच चेंडू खेळत होता. त्यामुळे सर्वांनाच वाटले होते की, राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफमध्ये दाखल होणार. परंतु फॉकनरने लेग साईडच्या दिशेने टाकलेल्या चेंडूवर, तारेने षटकार लगावला होता. यामध्ये कोरी अँडरसनने ४४ चेंडूत ९६ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सागरिका घाटगेबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल ७ वर्षे होते प्रेमसंबंध
“मी तिचा मालक नाही”, पत्नी बरोबरच्या फोटोमुळे ट्रोल करणाऱ्यांना इरफानने सुनावले खडेबोल
“पूर्वी १० पैकी ९ युवा खेळाडूंना विराट, सचिन किंवा धोनी बनायचे होते, पण आता बुमराह, शमी झाले आदर्श”