---Advertisement---

पहिल्याच लढतीत आरसीबीवर मात करण्यासाठी ‘या’ खेळाडूंसह मुंबईकर उतरतील मैदानात, ज्यूनीयर तेंडूलकरलाही मिळणार संधी?

On: मंगळवार, एप्रिल 6, 2021 8:51 AM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या दिवशी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमने-सामने येतील. हा सामना जिंकून हंगामाची विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
मात्र तरीही या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे पारडे जड मानल्या जाते आहे. त्यांचे खेळाडू सध्या फॉर्मात असून संघाचा समतोल देखील उत्तम आहे. याच निमित्ताने आपण त्यांची पत्नी पहिल्या सामन्यातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घेऊया.

फलंदाजीत नव्या खेळाडूंना संधी
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी फळीत काही फलंदाजांची जागा पक्की आहे. रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड हे फलंदाज पक्के आहेत. मात्र पहिल्या काही सामन्यांना क्विंटन डी कॉक मुकणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी ख्रिस लिन अथवा सौरभ तिवारी यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र यातही ख्रिस लिनचे पारडे जड आहे.

अष्टपैलूंच्या जागेवर पंड्या बंधू नक्की
मुंबई इंडियन्सच्या संघात अष्टपैलूंच्या जागेवर दोन नावे नक्की आहेत. हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या या पंड्या बंधूंची या स्थानावरील दावेदारी नक्की आहे. त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता नाही.

दमदार गोलंदाजी फळी
मुंबई इंडियन्सकडे मजबूत गोलंदाजी फळी उपलब्ध आहे. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट मागील हंगामाप्रमाणेच यावेळी देखील गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करतील. त्यांना साथ द्यायला नॅथन कुल्टर नाईल आणि लेगस्पिनर राहुल चहर हे पर्याय उपलब्ध असतील. याबरोबरच भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर यालाही या सामन्यात संधी दिली जाऊ शकते.

पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चाहर, नॅथन कुल्टर नाईल, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट किंवा अर्जुन तेंडूलकर.

महत्त्वाच्या बातम्या –

चेन्नई संघासाठी यंदा ‘हे’ खेळाडू ठरू शकतात ट्रम्पकार्ड, संघाच्या प्रशिक्षकानेच केला खुलासा

टेबल टेनिसमध्येही पुजाराच्या डिफेन्सने फोडला दीपक चहरला घाम, पाहा व्हिडिओ

आठ वर्षांपूर्वी विराटच्या विकेटसह बुमराहने घेतली होती आयपीएलमध्ये रॉयल एन्ट्री; आता म्हणतोय…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---