मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमयर लीग म्हणजेच आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात मुंबई संघाने आतापर्यंत पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र मागच्या दोन हंगामांमध्ये त्यांचे प्रदर्शन सुमार पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी आगामी आयपीएल हंगामापूर्वी तयारीला सुरुवात केली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना पुढच्या संगामात संघ कोणत्या रणनीतीसह मैदनात उतरेल, याची माहिती दिली.
आयपीएल 2023 हंगामापूर्वी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 23 डिसेंबर रोजी आयोजित केल्या गेलेल्या या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघ तयारीला लागला आहे. मार्क बाउचर (Mark Boucher) दक्षिण आफ्रिका संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज असून सध्या मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत आहेत. पुढच्या आयपीएल हंगामापूर्वी मुंबई संघ लिलावापासून त्यांच्या रणनीतीवर अमल करण्याचा प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. बाउचरच्या मते मुंबई इंडियन्स संघाला पराभव न स्वीकारण्याची सवय होती, मात्र मागच्या दोन हंगामात गोष्टी बदलल्या आहेत. बाउचर संघाला त्यांच्या जुन्या रूपात परत आणण्यासाठी प्रयत्नशील असतील.
तुम्ही खाली पडू शकता, पण पुन्हा उभं राहावं लागेल – मार्क बाउचर
माध्यमांशी बोलताना बाउचर म्हणाले की, “आपण मागच्या दोन हंगामांमधील आमच्या प्रदर्शनाविषयी बोललो. कधी-कधी वाईट काळातून जाण्यात काहीच गैर नसते. माझ्या मते आम्ही जे धडे घेतले, ते महत्वाचे आहेत. आम्ही बैठकीत या निराशाजनक हंगामांविषयी धडा घेण्याविषयी चर्चा केली आहे. मला वाटते ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही खाली पडू शकता, पण तुम्हाला पुन्हा एकदा उभ राहावं लागणार आहे. माझ्यासाठी पुढचा हंगाम म्हणजे पुन्हा उभं राहण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्सचा चाहतावर्ग खूप महत्वाचा आहे. चाहत्यांचा पाठींबा मिळाला, तर संघाला घरच्या मैदानात खेळणे फायदेशीर ठरेल. आम्ही चाहत्यांकडून मिळणार्या या समर्थनाची वाट पाहत आहोत.”
दरम्यान, मागच्या दोन हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणा होऊ शकले नाहीये. कारण या दोन्ही हंगामांमध्ये त्यांना प्लेऑफ्समध्ये जागा मिळू शकली नाहीये. अशात पुढच्या हंगामात संघ पुनरागमन करेल, असी सर्वांची अपेक्षा आहे. चाहते देखील मुंबईला पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. (Mumbai Indians ready for a comeback! The gameplan made by the head coach after the poor performance of last season)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना गमावला, पण श्रेयस अय्यरने करून दाखवला नाद पराक्रम; विराट अन् धोनीला पछाडत बनला अव्वल फलंदाज
रोहितने जीवाची बाजी लावून संघासाठी काढल्या धावा; पण गावसकरांच्या अपेक्षा खूपच जास्त; म्हणाले…