इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे आता सर्व संघातील जवळपास सर्व खेळाडू युएईला पोहचले आहेत. यातील काही खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आहे, तर काही खेळाडू क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. नुकतेच इंग्लंड दौऱ्याहून थेट आयपीएलसाठी युएईला आलेले भारत आणि इंग्लंडचे खेळाडू देखील सध्या क्वारंटाईन आहेत. यात मुंबई इंडियन्स संघातील सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या दोन खेळाडूंचाही समावेश आहे.
सूर्यकुमार आणि बुमराह आपापल्या पत्नीसह युएईत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पत्नीही क्वारंटाईनमध्ये आहेत. विशेष म्हणजे बुमराह ज्या हॉटेल रुममध्ये क्वारंटाईन आहे, त्याच्या वरच्याच मजल्यावरील हॉटेल रुममध्ये सूर्यकुमार क्वारंटाईन आहे. त्यामुळे हे दोन खेळाडू त्यांच्या रुमच्या गॅलरीतून एकमेकांशी बोलू शकतात. अशाच एका क्षणाचा फोटो मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे, त्यावर चाहत्यांनी अक्षरश: प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
मुंबई इंडियन्सची मजेशीर पोस्ट
सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा हे खालच्या मजल्यावरील जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजनाशी बोलत असतानाचा फोटो मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. या फोटोला मुंबईने कॅप्शन दिले आहे की “कदाचीत सुर्या म्हणतोय, अहो! तुमच्या कडे पाणी येतंय का?”
मुंबई इंडियन्स दिलेले हे मजेशीर कॅप्शन पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे अशाप्रकारची वाक्य साधारणत: महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून शेजाऱ्यांशी बोलताना ऐकू येतात. त्यामुळे अनेक मराठी भाषिकांना मुंबई इंडियन्सने दिलेले कॅप्शन भावले आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा संघ मानला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातून या संघाला मोठा पाठिंबाही मिळतो.
"अहो! तुमच्या कडे पाणी येतंय का?", Surya probably 🤣🤭#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 pic.twitter.com/4z1j3HZ75g
— Mumbai Indians (@mipaltan) September 15, 2021
प्रतिक्रियांचा पाऊस
सूर्यकुमार आणि बुमराहचा मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी रोज शेजाऱ्यांशी बोलताना वापरात येणारी नेहमीची वाक्य कमेंटमध्ये लिहिली आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले आहे की ‘तुमची सुद्धा लाइट गेली आहे का ?’ दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की ‘घरोघरी मातीच्या चूली.’ आणखी एका वापरकर्त्याने लिहिले की ‘बुमराह दादा तुमची पण केबल गेली काय?’
खरंतर मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच अशाप्रकारे मजेशीर पोस्ट करत असतात. तसेच त्यांना मराठी कॅप्शनही दिलेले असते. त्यामुळे चाहतेही त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात.
तुमची सुध्दा लाइट गेली आहे का ?
— Prithvi (@Prithvi10_) September 15, 2021
घरो घरी मातीच्या चूली😂
— A🇮🇳 (@OvertheCovers17) September 15, 2021
https://twitter.com/aniket_sl/status/1438171810650988557
आमचे कपडे वाळत घातले होते, चुकून खाली आले का वाऱ्याने 😃😅
— Rohan Gulavani (@ImRohanGulavani) September 15, 2021
काका मोटर बंद करा, टाकी भरली
— justPranavHere (@justPranavhere) September 15, 2021
पाणी संपलय तेवढं बोरच बटन दाबा की
— प्रशांत देवकर (@Prashantdevakar) September 15, 2021
हो हो टँकर मागवला आहे. आला की मी पाणी वर चढवतो तुम्ही गच्चीत जाऊन सोडा. 😂😂I can relate with this post ❤️❤️
— Prathmesh Dixit (@PrathmeshDixit2) September 15, 2021
असंही असू शकतं..👇
तुमचे कपडे गॅलरीत वाळत घालताना त्याला नीट क्लिप लावा. पुढच्या वेळेस परत असे गॅलरीत कपडे आले तर फेकून देईन बाहेर..
— किरण बोडके (@kiranb02) September 15, 2021
पक्का मुंबईकर Admin 🤣🤣💙💙😘🔥🔥
— Swapnil (@Swapn_7) September 15, 2021
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दुबईत होणार आहे. या सामन्यानेच दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होईल. सध्या मुंबई इंडियन्स आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स अव्वल क्रमांकावर असून चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्यां क्रमांकावर आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गज खेळाडूला धोनीने आधीच सांगितले “तुझी सीएसके प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनत नाही”
‘विराट कोहली आणि रवी शास्त्री कसोटी क्रिकेटचे उत्तम समर्थक आणि प्रचारक’, ऑसी दिग्गजाकडून कौतुक