fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहित शर्माचा सीएसकेला इशारा; म्हणाला, तयारी तर पूर्ण, आता फक्त…

September 19, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

Photo Courtesy: Twitter/ mipaltan


इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामाची सुरुवात होण्यासाठी काही तास शिल्लक आहे. यावेळी कोव्हिड-19 या साथीच्या रोगामुळे आयपीएलचे आयोजन युएईमध्ये होणार आहे. पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गतवर्षीचा उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात अबूधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांचे चाहते आणि क्रिकेटपटू या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सुमारे सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रिकेटपटू मैदानावर येणार आहेत, तर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर मैदानात उतरेल. या विशेष सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सीएसकेला इशारा दिला आहे.

रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मुंबई इंडियन्सबरोबरील सरावाची काही छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले की, “तयारी पूर्ण झाली आहे, आता योजना अंमलात आणण्याची वेळ आली आहे.”

View this post on Instagram

Prep work done. Time for execution 👊 @mumbaiindians

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on Sep 18, 2020 at 4:22am PDT

मुंबई इंडियन्स संघ सीएसके विरुद्ध नेहमीच चांगला खेळतो. इतकेच नव्हे तर, सीएसकेला मागील वर्षी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर एका धावाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. धोनी आणि त्याचा संघ हा पराभव विसरणार नाही. एकेवेळी असे वाटत होते की सीएसके सलग दुसर्‍या वर्षी हे विजेतेपद सहज जिंकेल, परंतु मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी विशेषत: लसिथ मलिंगाने हा सामना मुंबईच्या दिशेने फिरवला. सीएसकेने 2018 मध्ये विजेतेपद जिंकले आणि त्यानंतर 2019 मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

चेन्नई सुपर किंग्जचा संभाव्य ११ जणांचा संघ :

शेन वॉटसन, मुरली विजय, फाफ डु प्लेसीस, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार), केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, इम्रान ताहिर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.

मुंबई इंडियन्स संभाव्य ११ जणांचा संघ :

क्विंटन डि कॉक, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरान पोलार्ड, राहुल चहर, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

महत्त्वाच्या बातम्या –

दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश

आयपीएलचा पहिला सामना कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर

‘हा’ गोलंदाज मलिंगाची कमतरता पूर्ण करेल;ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने सांगितले नाव

ट्रेंडिंग लेख –

“नवा बोथम” म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफ विषयी १० रंजक गोष्टी

‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार

हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन


Previous Post

दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश

Next Post

पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

पहिलाच सामना जिंकायला धोनी 'या' ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात

Photo Courtesy: Twitter/Mipaltan

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यापूर्वी जाणून घ्या 'ही' खास आकडेवारी

आयपीएलमध्ये फक्त 'याच' देशातील मीडियाला असेल परवानगी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.