सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर येत्या १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी काही संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. लवकरच हे संघ युएईला देखील रवाना होणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्यामुंबई इंडियन्स संघाने देखील तयारीला सुरुवात केली आहे. हे खेळाडू रिलायन्सच्या जियो स्टेडियममध्ये सराव करत आहेत. आता त्यांची युएईला जाण्याची सर्व तयारी झाली असून शुक्रवारी (१३ ऑगस्ट)मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू युएईला रवाना होणार आहेत.
युएईतील अबू धाबी शहरात हा संघ थांबणार असून संघातील खेळाडूंना अबू धाबीतील हॉटेलमध्ये विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. यादरम्यान खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाईल. सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर हे खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरतील. या मैदानावर सराव केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ दुंबईची वाट धरेल. याच मैदानावर त्यांना १९ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळायचा आहे.
आयपीएल स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. स्थगित करण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. त्यांनी या स्पर्धेत ७ सामने खेळले होते. यापैकी ३ सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले होते; तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. (Mumbai Indians squad will travel to Abu Dhabi on Friday ahead of Indian premier league)
आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी असा आहे मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा (कर्णधार), क्रुणाल पंड्या, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, आदित्य तारे, अनुकुल रॉय, अनमोलप्रीत सिंग, क्विंटन डी कॉक, एडम मिल्ने, नाथन कूल्टर-नाइल, पीयूष चावला, धवल कुलकर्णी, जयंत यादव, मोहसिन खान , कायरोन पोलार्ड, सौरभ तिवारी, जिमी नीशम, युद्धवीर चरक, मार्को जानसेन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या,ख्रिस लिन, अर्जुन तेंडुलकर
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स मैदानावर रोहितचा ७६ मीटरचा लांबलचक सिक्स अन् चाहत्यांचा आनंद गगनात; केला भरपूर जल्लोष
चौकारानंतर चौकार खेचत रोहितने सॅम करनची केली ‘दुर्दशा’, व्हिडिओ जोरदार व्हायरल
पुजाराची विकेट अँडरसनसाठी ठरली विक्रमी, भारताविरुद्ध ‘ही’ किमया साधणारा ठरला पहिलाच गोलंदाज





