न्यूझीलंडने नूकतेच कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे यजमानपद भूषवले आहे. आता या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर संघाला पांढऱ्या चेंडूचे सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडने मोठी घोषणा केली असून पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये आपला नवीन पूर्णवेळ कर्णधार जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा नवा कर्णधार म्हणून मिचेल सँटनरची निवड करण्यात आली असून तो केन विल्यमसनची जागा घेणार आहे. 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर विल्यमसनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून किवी संघ बदलीच्या शोधात होता, जो आता सँटनरने संपवला.
2015 मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिचेल सँटनरने 243 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान त्याने काही प्रसंगी एकदिवसीय आणि टी20 या दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. त्याने एकूण 28 पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. ज्यामध्ये 4 वनडे आणि 24 टी20 सामने आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 4 सामन्यात 1 विजय आणि 2 पराभव, तर 1 सामना अनिर्णित राहिला. तर टी-20 मधील 24 सामन्यांपैकी 13 जिंकले आणि 9 गमावले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. आयपीएल 2025च्या मेगा लिलावात मिचेल सँटनरला मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे.
News | Mitchell Santner has been appointed the new BLACKCAPS white ball captain, officially taking over the role from Kane Williamson, who stepped down following the ICC T20 World Cup in June. #CricketNation https://t.co/nnMQJt5Q1R
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 17, 2024
व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचा पूर्णवेळ कर्णधार बनल्याबद्दल मिचेल सँटनर म्हणाला, “हा साहजिकच एक मोठा सन्मान आणि विशेषाधिकार आहे, जेव्हा तुम्ही लहान असताना न्यूझीलंडसाठी खेळण्याचे स्वप्न नेहमीच होते, परंतु अधिकृतपणे दोन फॉरमॅटमध्ये तुमच्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हे विशेष आहे. हे एक नवीन आव्हान आहे आणि मी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटच्या महत्त्वाच्या टप्प्यात अडकण्यासाठी मी उत्सुक आहे.”
हेही वाचा-
IND vs AUS; गाबा कसोटीत शानदार खेळी केल्यानंतर, केएल राहुल म्हणाला…
IND vs AUS; मोहम्मद सिराजवर भडकले सुनील गावसकर? नेमकं कारण काय?
IND vs AUS; पाचव्या दिवशी कसे असणार ब्रिस्बेनचे हवामान? पाऊस घालणार खोळंबा?