---Advertisement---

कार अपघातात मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा मृत्यू? जाणून घ्या खरं काय ते 

On: शनिवार, जानेवारी 30, 2021 5:14 PM
---Advertisement---

सोशल मीडियावर कोणती घटना केव्हा व्हायरल होईल? हे सांगता येत नाही. मग ती घटना खरी असो अथवा खोटी, लोक बंद डोळ्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवत असतात. याचमुळे अनेकदा खोट्या घटनांचे व्हिडिओ, फोटो किंवा ग्राफिक्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचा प्रकार घडतो. असेच काहीसे मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू व वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू कायरन पोलार्ड याच्याबद्दल घडले आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, पोलार्डचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. व्हिडिओची सत्यता तपासली असता समजले की ही बातमी पूर्णत: खोटी आहे. पोलार्ड सध्या अबुधाबी येथे सुरू असलेल्या टी10 लीगमध्ये खेळत असून तो पूर्णतः तंदुरुस्त आहे. सदर व्हिडिओ ज्या दिवशी वायरल झाला त्यादिवशी पोलार्ड टी10 लीगमध्ये सामना खेळत होता. पोलार्ड या लीगमध्ये डेक्कन ग्लेडिएटर्स संघाचे नेतृत्व करत आहे.

सुरेश रैनासोबत घडली होती अशी घटना

काही वर्षांपूर्वी सुरेश रैनाबद्दल देखील अशीच घटना घडली होती. रैनाचा अपघात झाल्याचे व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर रैनाने स्वतः पुढे येत ही बातमी खोटी असल्याचे सांगितले होते.

“गेल्या काही दिवसांपासून माझ्या अपघाती निधनाचे वृत्त येत आहे. माझा कार अपघातात मृत्यु झाल्याचे त्यात सांगितले जात आहे. यामुळे माझा मित्र परिवार तसेच कुटूंबियांना याचा त्रास होत आहे. चाहत्यांनी अशा कोणत्याही वृत्तांकडे लक्ष देऊ नये. मी पुर्णपणे ठिक आहे. असे वृत्त देणाऱ्या युट्युब चॅनेल्सची मी तक्रार केली आहे आणि त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल.” असे त्याने म्हटले होते.

मुंबई इंडियन्सला जिंकून दिली आयपीएल ट्रॉफी 

धाकड फलंदाज कायरन पोलार्ड हा आयपीएलच्या मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू आहे. आजवर पोलार्डने मुंबईकडून १६४ आयपीएल सामने खेळले असून ३०२३ धावा केल्या आहेत. तसेच ६० विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्याने केला आहे. याबरोबरच गतवर्षी मुंबईला पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएल २०२० मध्ये १६ सामने खेळताना एका अर्धशतकासह त्याने २६८ धावा केल्या होत्या. तसेच संघ कर्णधार रोहित शर्मा याला दुखापत झाल्यानंतर त्याने काही सामन्यात संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

बाबा हारले तरीही मुलगी आनंदी! कोहलीच्या ‘त्या’ खास गिफ्टमुळे वॉर्नरची चिमुकली खूश, पाहा फोटो

भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघातील अंतर्गत वाद उघड; प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यावर झाले ‘हे’ आरोप

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीचा अजिंक्य रहाणेला फायदा, कसोटी क्रमवारीत पटकावलं ‘हे’ स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---