आयपीएल 2024 साठी खेळाडूंना रिटेन करण्याच्या अखेरच्या दिवशी (26 नोव्हेंबर) पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या कायम ठेवलेल्या व करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये मुंबईने 17 खेळाडूंना कायम ठेवले होते तर, 11 खेळाडूंना करारमुक्त केलेले. मात्र, आता रिटेन्शनच्या दुसऱ्या दिवशी सुरू झालेल्या दुसऱ्या ट्रेड मध्ये मुंबईने मोठा डाव खेळला. त्यांनी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याला आपल्याकडे घेतले. मात्र, त्या बदल्यात त्यांना ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याला रिलीज करावे लागले.
📢 Announced!
𝗛𝗮𝗿𝗱𝗶𝗸 𝗣𝗮𝗻𝗱𝘆𝗮 ➡️ 𝗠𝘂𝗺𝗯𝗮𝗶 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻𝘀
𝗖𝗮𝗺𝗲𝗿𝗼𝗻 𝗚𝗿𝗲𝗲𝗻 ➡️ 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗮𝗻𝗴𝗮𝗹𝗼𝗿𝗲#IPL pic.twitter.com/oyuAtP7Q27
— IndianPremierLeague (@IPL) November 27, 2023
हार्दिक पुन्हा एकदा मुंबईसाठी खेळणाऱ्या प्रकारच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. अखेर सोमवारी त्यावर मोहोर उमटली. हार्दिक 15 कोटी रुपयांच्या किमतीत मुंबईकडे पोहोचला. त्या बदल्यात त्यांना ही रक्कम जुळवण्यासाठी अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याला ट्रेड करावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला 17 कोटी 50 लाख या मोठ्या किमतीत आपल्याकडे खेचले. यामुळे मुंबईकडे आयपीएल लिलावात अडीच कोटी रुपये अधिकचे शिल्लक राहिले.
ग्रीन मागील वर्षी प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. साडे सतरा कोटींची मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्याने मुंबईसाठी चांगली कामगिरी देखील केली होती. त्याने स्पर्धेत 16 सामने खेळताना 50.20 च्या शानदार सरासरीने 452 धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतके व एका शतकाचा समावेश होता. तसेच गोलंदाजीत देखील त्याने सहा बळी टिपलेले.
ग्रीन आरसीबीचा भाग झाल्याने आरसीबीची फलंदाजी आता अधिक स्फोटक दिसून येते. आरसीबीकडे यापूर्वीच विराट कोहली, प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार व दिनेश कार्तिक असे आक्रमक फलंदाज उपलब्ध आहेत.
(Mumbai Indians Trade Cameron Green To RCB Hardik Pandya Join Mumbai Indians)
हेही वाचा-
IPL 2024: गुजरात टायटन्सचा कर्णधार बनताच शुबमन गिलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘इतक्या चांगल्या…’
IPL ब्रेकिंग! पंड्या मुंबईकडे जाताच Gujarat Titansचे कर्णधारपद ‘या’ पठ्ठ्याकडे, उंचावतील तुमच्याही भुवया