---Advertisement---

VIDEO: मुंबई इंडियन्सने केली टॉस-फिक्सिंग? केकेआरचा कॅप्टन रहाणेही पडला गोंधळात

On: सोमवार, मार्च 30, 2026 10:16 AM
---Advertisement---

आयपीएल २०२६ च्या हंगामात दुसरा सामना रविवारी (२९ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने आयपीएलमधील आपल्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करत विजय मिळवला, मात्र सामन्यावेळी घडलेल्या एका घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद नाणेफेकीचा असून क्रिकेट चाहत्यांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एकाने तर असे मुंबई इंडियन्ससोबतच का घडले असा प्रश्न विचारला आहे.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक केली आणि कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने कॉल दिला, मात्र जेव्हा ते नाणे जमिनीवर पडले तेव्हा ते कोणत्या बाजूने पडले हे कॅमेरामध्ये दाखवले नाही. लगचेच मुंबईला विजयी घोषित केले. त्यामुळे चाहत्यांमध्ये याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. काहींनी याला ‘टॉस-फिक्सिंग’ असे म्हटले आहे, तर काहींनी नाण्यामुळे कॅमेऱ्यात जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

हार्दिकने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राहाणेनेही प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली. वानखेडेच्या खेळपट्टीबद्दल रहाणेने आश्चर्य व्यक्त केले. त्याने म्हटले की यापूर्वी वानखेडेच्या खेळपट्टीवर एवढे गवत कधीही पाहिले नव्हते. त्याने ज्या खेळपट्ट्यांवर सराव केला त्या पूर्णपणे वेगळ्या होत्या.

यावेळी कोलकाताने फलंदाजीला आक्रमक सुरूवात केली. फिन ऍलन ३७ धावा (१७ चेंडू) करत बाद झाला, मात्र रहाणेने डाव सांभाळला. त्याने ४० चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६७ धावा केल्या. अंगकृष रघुवंशीने २९ चेंडूत ९१ धावा केल्या आणि रिंकू सिंग २१ चेंडूत ३३ धावा करत नाबाद राहिला. त्यामुळे कोलकाताने २० षटकात ४ विकेट्स गमावत २२० धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकुरची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्याने ४ षटकात ३९ धावा देत रहाणे, ऍलन आणि कॅमेरुन ग्रीन यांच्या विकेट्स घेतल्या. ग्रीन १० चेंडूत १८ धावा करत बाद झाला.

प्रत्युत्तरात रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा यांनी चौकार-षटकारांची बरसात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ चेंडूत १४८ धावा केल्या. रिकल्टन ८१ धावा (४३ चेंडू) करत रनआऊट झाला. रोहितने ३८ चेंडूत ६ चौकार आणि तेवढेच षटकार मारत ७८ धावा केल्या. बाकी राहिलेली कामगिरी सूर्यकुमार यादव (१६ धावा), तिलक वर्मा (२० धावा) आणि हार्दिक पांड्या (नाबाद १८ धावा) यांनी केली. हा सामना मुंबईने ६ विकेट्स आणि ५ चेंडू शिल्लक राखत जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---