बुधवारी (3 मे) मोहालीत मुंबई इंडियन्सने नेत्रदीपक फलंदाजी करत पंजाब किंग्जवर विजय मिळवला. विजयासाठी मुंबईला 215 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 7 चेंडू आणि 6 विकेट्स राखून गाठले. युवा तिलक वर्मा याने विजयी षटकार मारून मुंबईला विजय मिळवून दिला. त्याआधी ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी संघासाठी मोठी भागीदारी केली होती. पंजाबसाठी लियाम लिविंगस्टोन याने मोठी खेळी केली होती, मात्र ही खेळी पंजाबला विजय मिळवून देऊ शकली नाही.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जने 20 षटकांमध्ये 3 विकेट्सच्या नुकसानावर 214 धावा केल्या. लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने पंजाबसाठी सर्वाधिक 82* धावांची खेळी केली. तर जितेश शर्मा याने 27 चेंडूत 49* धावांचे योगदान दिले. पंजाबने मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला. पण पिषुय चावला याही सामन्यात आपली गुणवत्ता सिद्ध करू शकला. चावलाने 4 षटकात 29 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मुंबाईला चांगलाच महागात पडला आर्चरने 4 षटकात 56 धावा खर्च करून एकही विकेट घेतली नाही.
That's that from Match 46.@mipaltan register a 6-wicket win against #PBKS to add to crucial points to their tally.#MI chase down the target in 18.5 overs.
Scorecard – https://t.co/IPLsfnImuP #TATAIPL #PBKSvMI #IPL2023 pic.twitter.com/SeKR48s9Vv
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
मुंबई इंडियन्सचे सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन 215 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आले. चाहते आणि सहकाऱ्यांना या दोघांकडून वेगवान सुरूवात अपेक्षित होती. पण रोहितने 3 चेंडू खेळल्यानंतर एकही धाव न करता विकेट गमावली. पण त्यानंतर इशान किशनने 41 चेंडूत 75 धावांची खेळी केली. या सामन्यात सूर्यकुमार यादव याने 31 चेंडूत 66 धावांचे योगदान मुंबईच्या विजयात दिले. शेवटची तिलक वर्मा आणि टिम डेविड नाबाद राहिले. दोघांनी प्रत्येकी 10-10 चेंडू खेळले आणि अनुक्रमे 26 आणि 19 धावांचे योगदान दिले. लखनऊच्या गोलंदाजी आक्रमणात ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग याने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. नेथन एलिस इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आला आणि त्याने दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग याने चार षटकात तब्बल 66 धावा खर्च केल्या (Mumbai Indians won by 6 wickets against Punjab Kings)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
11.50 कोटीच्या फलंदाजाकडून जोफ्रा आर्चरचे बेदम धुलाई! पंजाब किंग्जची धावसंख्या पुन्हा एकदा 200+
पावसात ग्राउंड स्टाफच्या मदतीनेला धावला जॉन्टी रोड्स, उत्साह पाहून तुम्हीही कराल कौतुक