भुवनेश्वर, २५ डिसेंबर: अल्टीमेट खो-खो चा सीझन दोन कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुर आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी सुरु केलेली ल्टीमेट खो खो पहिल्या सीझनमध्ये जबरदस्त हिट ठरली होती जी भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षकसंख्येच्या दृष्टीने बिगर क्रिकेट स्पर्धा म्हणून उदयास आली. अल्टीमेट खो-खो हि पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेला यूके स्थित बीएनपी ग्रुपने निधीची उपलब्धता करून दिली आहे. अल्टीमेट खो-खो चे सर्व सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील. आजच्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीसचा ४ गुणांनी पराभव करत गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले.
आज झालेल्या पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीसला ३४-३० (मध्यंतर १७-९) असे ४ गुणांनी पराभूत केले. मुंबई खिलाडीसचा कर्णधार अनिकेत पोटेने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. हा त्याचा निर्णय अतिशय योग्य ठरवत मुंबई खिलाडीसच्या संरक्षकांनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत पहिल्या टर्नमध्ये संरक्षणात ड्रीम रन्सचा १ गुण मिळवला. तर गुजरात जायंट्सने १४ गुण मिळवत खेळावर पकड मिळवली. त्यानंतर गुजराताने ड्रीम रन्सचे तीन गुण वसूल करताना मुंबई खिलाडीसला कडवी लढत दिली. मात्र या दुसऱ्या टर्नमध्ये मुंबई खिलाडीसला फक्त ८ गुणच मिळवता आले. यावेळी गुजरात कर्णधार अक्षय भांगरे १,१२ मि. संरक्षण सुयश गरगटे १.४८ मि. संरक्षण व अभिनंदन पाटील यांनी उत्कृष्ट संरक्षण केले. दुसऱ्या डावात व तिसऱ्या टर्न मध्ये धमाकेदार खेळ करत गुजरातने मुंबईला तगडे आव्हान देत एक एक पाउल विजयाकडे टाकत होते. गुजरातने एकूण ३४ गुण वसूल केले. त्यामुळे मुंबईची वाटचाल बिकट झाली. शेवटच्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसने जोरदार मुसंडी मारत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते सपशेल अपयशी ठरले. या सामन्यात गरगटेला संरक्षक पुरस्कार देऊन गौरविले.
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS । बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर, केएल राहुलमुळे भारत सुस्थितीत
VIDEO । थोडक्यात वाचला शार्दुल! मुंबईने पाच कोटी दिलेल्या गोलंदाजाने फोडलं असतं डोकं