वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. साखळी फेरी संपल्यानंतर आता उपांत्य फेरी व अंतिम सामना होईल. पहिली उपांत्य लढत ही भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणार आहे. तर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका भेटणार आहेत. तत्पूर्वी, भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान मुंबई येथे होणाऱ्या पहिल्या सेमी फायनलच्या तिकिटांचा मोठा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.
गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेला भारत आणि चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंड यांच्या दरम्यान 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहे. अशात तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी मालाड येथून आकाश कोठारी नामक एका व्यक्तीला अटक केली असून, हा व्यक्ती तिकिटे मोठ्या किमतींना विकत होता. तो तीन ते पाच हजार किमतीची थेट 27 हजार ते जवळपास अडीच लाख रुपयांपर्यंत विकताना आढळला. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 511 यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडे ही तिकिटे कोठून आली याबाबत अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत. यापूर्वी कोलकाता येथे झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या देखील तिकिटांचा असाच काळाबाजार समोर आला होता.
भारतीय संघ या उपांत्य सामन्यात मोठ्या तयारीने उतरेल. मागील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे असणार आहे.
(Mumbai Police Arrest Man Held Black Marketing Ticket Of India v Newzealand)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान