मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ यांच्यात सध्या रणजी स्पर्धा 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भाच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आहे.
मुंबईच्या टीममध्ये पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर यांसारखे मोठे फलंदाज आहेत. यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलं नाव कमावलंय. पूर्ण स्पर्धेत हे फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यामुळे अंतिम सामन्यात चाहत्यांना त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र या तिघांनीही चाहत्यांना निराश केलं आहे. विदर्भाच्या धारदार गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे हे दिग्गज फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
कर्णधार अजिंक्य रहाणे 35 चेंडूत केवळ 7 धावा करून बाद झाला. त्याला हर्ष दुबेनं ध्रुव शौरेच्या हाती झेलबाद केलं. तर श्रेयस अय्यरही 15 चेंडूत 7 धावा करून तंबूत परतला. तो उमेश यादवच्या गोलंदाजीत करुण नायरच्या हाती झेल देऊन बाद झाला. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉनं थोडाफार संघर्ष केला. मात्र तोही 63 चेंडूत 46 धावा करून परतला. त्याला हर्ष दुबेनं बोल्ड केलं.
अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर एकवेळ मुंबईची अवस्था 6 बाद 111 अशी दयनीय झाली होती. मात्र त्यानंतर शार्दूल ठाकूरनं येऊन डाव सांभाळला. त्यानं मैदानावर येताच जोरदार फटकेबाजी सुरू केली. शार्दूलनं केवळ 37 चेंडूत आपलं अर्धशतक साजरं केलं. आपल्या या आक्रमक खेळीत त्यानं 6 चौकार आणि 2 षटकार हाणले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
मुंबई – पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे
विदर्भ – अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, अक्षय वाडकर (कर्णधार/विकेटकीपर), आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकूर, आदित्य ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या-
ICC रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा कायम, तिन्ही फॉरमॅटमध्ये बनली नंबर 1
IPL मध्ये लांब केसांचा लूक घेऊन परततोय ‘थाला’! नेटमध्ये सरावाला सुरुवात; CSK ने शेअर केला व्हिडिओ