मुआयपीएल २०२१ मध्ये पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिलेली नाही. मुंबईने पाचपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. शुक्रवारी (२३ एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध अखेरच्या सामन्यात संघाला केवळ १३१ धावा करता आल्या आणि यामुळे त्यांना ९ गड्यांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यानंतर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने ट्वीटद्वारे टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात असे काहीतरी घडले होते, त्यामुळे पोलार्ड चाहत्यांसह दिग्गजांच्या निशाण्यावर आला होता.
पोलार्डने दिले प्रत्युत्तर
सामन्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गोलंदाजी करण्यापूर्वी नॉन-स्ट्राईकवर असलेला पोलार्ड क्रीजच्या बाहेर आला होता. पोलार्डने हे केल्यानंतर, मंकडींग विवादावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आणि सोशल मीडियावरील माजी खेळाडू आणि चाहत्यांनी पोलार्डवर टिका करण्यास सुरुवात केली.
त्याला उत्तर म्हणून पोलार्डने ट्विटरवर एक चित्र पोस्ट केले, त्यावर त्याने लिहिले की, ‘मी प्रतिक्रिया देत नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की मी तुमचे शब्द ऐकले नाही.’ पोलार्डने या चित्राला कॅप्शन देताना लिहिले, ‘या लोकांवर प्रेम केले पाहिजे, अशा गोष्टी करणे हा कोणाचा उद्देश नसतो. खूप हसलो.’
Got to love these individuals who suppose to be objective … laughable at best 😇😇😇😇😇!! pic.twitter.com/tWRs4cFBpj
— Kieron Pollard (@KieronPollard55) April 24, 2021
या आधीदेखील घडली होती घटना
आयपीएल २०२१ मध्ये ही अशी पहिलीच घटना नव्हती, जेव्हा गोलंदाजाने चेंडू फेकण्यापूर्वी नॉन स्ट्राईकवरील फलंदाज क्रीजच्या बाहेर गेला होता. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान हा प्रकार घडला होता. त्यावेळी ड्वेन ब्राव्हो राजस्थानचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान चेंडू टाकण्यापूर्वी क्रीजच्या पुढे गेला. त्यावेळी समालोचन करणाऱ्या हर्षा भोगले यांनी हे थांबविण्यासाठी कडक नियम पाहिजेत असे म्हटले होते.
आयपीएलमध्ये गाजला होता मंकडींग वाद
आयपीएल २०१९ मध्ये रवींद्र जडेजाने जोस बटलरला बाद केल्यानंतर हा वाद वाढला होता. एनेमा वर पुन्हा विचार करण्यात यावा आणि नवीन नियम लागू करावेत अशी मागणी करण्यात आली होती. रविचंद्रन अश्विने त्यानंतर शिखर धवन व ऍरॉन फिंच यांना देखील मंकडींग करण्याचा प्रयत्न केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आईच्या हातचा घास, बहिणीचा प्रेमळ मिठी अन् बाबांची शिकवण; कुटुंबीयांच्या आठवणीत सुंदर झाला भावुक
“आरसीबीत एक नव्हे दोन ३६० डिग्री फलंदाज, मग गोलंदाज…,” माजी भारतीय कर्णधाराचे मोठे वक्तव्य
नाणेफेकीचा कौल सीएसकेच्या पारड्यात, धोनी आणि विराटच्या संघात झाले ‘हे’ प्रमुख बदल